Aai Kuthe Kay Karte मालिकेत वातावरण बदलणार...असा असेल पुढील कथाभाग?

'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्ध ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता मिलिंद गवळीनं एक व्हिडीओ पोस्ट करत कथानकातील मोठ्या बदलाचे संकेत दिलेयत.
Marathi Serial: Aai Kuthe Kay Karte New Track, Milind Gawali Video Post
Marathi Serial: Aai Kuthe Kay Karte New Track, Milind Gawali Video PostEsakal

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नुसतीच भांडणं होताना दिसत आहेत. देशमुखांचे घर जे नेहमी 'आनंदाचं नंदनवन' म्हणून दाखवलं जायचं तिथे जणू कुस्तीचा आखाडा रंगलेला दिसत आहे. अभिषेकनं बायको गरोदर आहे याचा फायदा घेत जो काही बाहेरख्यालीपणा केला आहे तो आता सर्वांसमोर आल्यानं मालिकेत भांडणाला पूर आलेला दिसत आहे.

अर्थात करून-सवरुन झाल्यानंतर अभिषेक जी काही मुक्ताफळं उधळताना दिसतोय आणि आपली चूक मान्य करत नाही त्यामुळे तर चाहते भलतेच भडकले होते. अर्थात याचा परिणाम टीआरपीवर झाला आहे. पण लागलीच लेखिकेनं मालिकेत एक नवा ट्रॅक आणला आहे ज्यानं मालिकेतलं वातावरण पुन्हा बदलेल असं दिसतय. हे आम्ही नाही सांगत आहोत तर मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळीच्या पोस्टमधनं समोर आलं आहे. अर्थात हे त्यानं स्वतः चाहत्यांना सांगितलं आहे. चला,जाणून घेऊया नेमकं काय म्हणाला आहे मिलिंद पोस्टमध्ये.

Marathi Serial: Aai Kuthe Kay Karte New Track, Milind Gawali Video Post
KRK: 'सुशांत सिंग राजपूत सारखेच मलाही...', केआरके च्या नव्या ट्वीट्सनी सोशल मीडियावर खळबळ...

लवकरच अभिषेक आणि अनघाला मूल होणार होतं,पण आता अभिषेकचं सत्य समोर आल्यावर अनघा आणि मुलाच्या जीवाला धोका आहे असा ट्रॅक सुरु आहे. पण तरीदेखील पुढे काय घडणार याचा मागमूस लागत नव्हता. अनघा आणि मुल सुखरूप असले तरी घरी परतणार का? आणि परतल्यावरही देशमुखांच्या घरात टेन्शनच पहायला मिळणार तर काय मज्जा. पण आता मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे मिलिंद गवळीनं एक पोस्ट करत आता वातावरण बदलणार असं सांगितलं आहे त्यानं सोबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

अनिरुद्धनं पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत तो एका गोंडस बाळाला कडेवर घेऊन दिसत आहे. आणि तो व्हिडीओ पोस्ट करत एकार्थानं मिलिंदने मालिकेतला पुढचा कथाभाग कसा असेल याचे संकेत दिले आहेत. त्यानं लिहिलं आहे की,गोड गोंडस परी राणी”त्विशा”
“आई कुठे काय करते “ या मालिकेमध्ये देशमुख कुटुंबात आता आली आहे एक
नवीन मेंबर

कसली गोंडस आहे “ त्विशा “ .
सहसा लहान मुलं दुसऱ्या कोणाकडे अशी पटकन जात नाही,
पण हे बाळ अगदी हसत खेळत माझ्याकडे आलं,
असं वाटलं नाही की पहिल्यांदाच हिला आपण पाहिलंय,
भेटलोय, अगदी आपल्या कुटुंबांमध्ये एक नवीन मेंबर आला आहे असंच वाटत होतं,
तिने क्षणात सगळ्यांनाच आपलंसं करून घेतलं.
लहान बाळ असेल तर आपोआपच भाभी चैतन्य पसरतं,
जीवन किती सुंदर आहे असं वाटायला लागतं,
चेहऱ्यावरील निरागस हास्य,
आमच्या सेटवरचे वातावरणच बदलून गेलं आहे.
प्रेक्षकांना सूद्धा खूप छान वाटणार आहे बाळाच्या आजूबाजूला घडणारे प्रसंग बघून .

Marathi Serial: Aai Kuthe Kay Karte New Track, Milind Gawali Video Post
Namrata Shirodkar चा लग्नाच्या १७ वर्षांनतर मोठा खुलासा; म्हणाली,'माझं करिअर संपायला जबाबदार..'

मिलिंदच्या पोस्टवरनं मालिकेत काहीतरी नवं वळण येतंय याचा अंदाज लागल्यावर चाहत्यांनी देखील मग त्याच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहतीनं तर चक्क लिहिलं आहे की,'बरं झालं वातावरण बदलणार..नाहीतर रोजची भांडणं पाहून बोर झालो होतो'. तर अनेकांनी नव्या कथाभागाविषयी आनंद व्यक्त करताना आपले अंदाजही सांगितले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com