
नादखुळा म्युझिक लेबलच्या 'आपली यारी' गाण्याने विक्रम केला आहे. या गाण्याला अवघ्या 12 तासांमध्येच दशलक्ष व्ह्युज मिळाले. 'मराठी इंडस्ट्रीतला मिलियनियर म्युझिक डायरेक्टर' अशी ओळख असलेल्या प्रशांत नाकतीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने गुरूवारी आपली यारी हे गाणे सोशल मीडियाद्वारे लाँच केले. बॉलिव़ूड निर्माता निखिल नमीत आणि प्रार्थना बेहेरे गेले दहा वर्षांपासून मित्र आहेत. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमित्ताने प्रार्थनाने निखिल नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे आपली यारी हे गाणे नुकतेच सोशल मीडियाद्वारे रिलीज केले. या गाण्यात पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स दिसत आहेत. (marathi social media influencers Aapli Yaari song most viewed Marathi song in the first 24 hours slv92)
याविषयी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “नादखुळा या निखिलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमित्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, ह्याचा मला आनंद आहे. निखिलची आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. त्यामुळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”
निर्माता निखिल नमीत म्हणतात, "आपली यारी गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि ‘जगात लय भारी’ अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमूळे आम्ही या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय. 12 तासांत गाण्याने 1 मिलियनचा टप्पा गाठावा, ह्याचे पूर्ण श्रेय प्रशांतच्या सुरेल संगीताला जाते. ”
'आपली यारी' गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे. पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रद्धा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.