esakal | लग्नाच्या वाढदिवशीच सखी-सुव्रत कोव्हिड पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

Sakhi Gokhale and Suvrat Joshi

लग्नाच्या वाढदिवशीच सखी-सुव्रत कोव्हिड पॉझिटिव्ह

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठी मालिकांमधील लोकप्रिय जोडी सुव्रत जोशी Suvrat Joshi आणि सखी गोखले Sakhi Gokhale यांना कोरोनाची लागण झाली. लग्नाच्या वाढदिवशीची सखी आणि सुव्रतच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र कुटुंबातील इतर सदस्य घाबरू नये म्हणून कोणालाच सुरुवातीला कल्पना दिली नाही, असं सुव्रतने सांगितलं. सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुव्रतने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. (marathi tv couple Suvrat Joshi and Sakhi Gokhale test positive for COVID 19)

सुव्रतची पोस्ट-

'१२ एप्रिल रोजी, आमच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी, सखी आणि मी एकमेकांना अनोखी भेट दिली. आम्ही दोघंही कोव्हिड पॉझिटिव्ह आलो. इतरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून आम्ही फार कोणाला सांगितलं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघंही सर्व नियमांचं पालन करतोय. हळहळू मी व्यायामाला सुरुवात केली आहे. जवळपास दोन आठवड्यांनंतर आम्ही प्लाझ्मादान करण्यासाठी सज्ज असू. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर मी परदेशात दोन वेब सीरिज, एक लघुपट आणि एका चित्रपटासाठी काम केलं. आम्ही अमर फोटो स्टुडिओचे शोसुद्धा पुन्हा सुरू केले. अनेक लोकांशी माझा संपर्क आला होता आणि मला कोरोना होऊन गेला असेल असं वाटत होतं. कदाचित त्याची लक्षणे मला जाणवली नसतील असं वाटलं. पण नाही. कोरोनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येकाने काळजी घ्या, अशी मी विनंती करतो', अशी पोस्ट सुव्रतने लिहिली.

हेही वाचा : ट्विटरनंतर कंगनाला फॅशन डिझायनर्सकडून धक्का; सोबत काम करण्यास दिला नकार

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत एकत्र काम करताना सखी आणि सुव्रत एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्षांपूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि गेल्या काही महिन्यांपासून दोघं परदेशात राहत आहेत.