esakal | ऐन लग्नात फुटणार डॉ. अजित कुमारचं बिंग; डिंपललाही होणार अटक?
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन लग्नात फुटणार डॉ. अजित कुमारचं बिंग;  डिंपललाही होणार अटक?

ऐन लग्नात फुटणार डॉ. अजित कुमारचं बिंग; डिंपललाही होणार अटक?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

एखाद्या व्यक्ती त्याच्या लाघवी बोलण्यामुळे अनेकांचं मन जिंकून घेत असतो. त्यामुळे लोकही अशा व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवतात त्याला देवमाणसाचा दर्जा देतात. परंतु, काही जण देवाप्रमाणे वागण्याचं केवळ नाटक करत असतात. प्रत्यक्षात त्यांच्या मनात व डोक्यात वेगळेच विचार असतात. असंच दुहेरी व्यक्तीमत्त्व घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित 'देवमाणूस' devmanus ही काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि पाहता पाहता ती तुफान लोकप्रिय झाली. सध्या ही मालिका रंजक वळणावर पोहोचली असून डॉ. अजित कुमार व डिंपल यांच्या लग्नाची गडबड सध्या मालिकेत पाहायला मिळत आहे. मात्र, ऐन लग्नात डॉक्टरांचं बिंग फुटण्याचीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. (marathi-tv-show-devmanus-ajit-kumar-dev-dimple-wedding-acp-divya)

अजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे डिंपलच्या घरी लग्नाची गडबड सुरु आहे. परंतु, हे लग्न होऊ देणार नाही असा ठाम निर्धार सरु आजीने केला आहे. तर, दुसरीकडे दिव्यादेखील अजितविरोधात पुरावे गोळा करत आहे. त्यामुळे दिव्याच्या हातील लागलेल्या पुराव्यांच्या आधारे ती ऐन लग्नातच अजितचं बिंग उघड करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, अजितला प्रत्येक गुन्ह्यात मदत करणाऱ्या डिंपलला देखील यावेळी अटक होणार की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे देवमाणूस या मालिकेत आता नेमकं काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.