'मरजावां' चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धार्थ आणि रितेश परत एकत्र !

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांचा आगामी चित्रपट 'मरजावां' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांचा आगामी चित्रपट 'मरजावां' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. काही वेळापूर्वी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. याआधी रितेश आणि सिद्धार्थ 'एक विलेन' या चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. 

या चित्रपटामध्ये सिद्धार्थ 'अॅंग्री यंगमॅन' च्या लुकमध्ये दिसणार आहे. तसेच रितेश आणि सिद्धार्थसोबत अभिनेत्री तारा सुतारिया दिसणार आहे. तारा सुतारियाने करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ दि इयर' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिनेमामध्ये तारा आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शनसह दमदार डायलॉगही ऐकाला मिळत आहेत. त्यापैकी एक डायलॉग असा आहे, 'इश्क मे मारुंगा भी और मरुंगा भी'. 

चित्रपटाची कथा प्रेम आणि द्वेष यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की,'मरजावां एक लव्हस्टोरी आहे ज्यामध्ये तुम्हाला भरपूर अॅक्शन आणि डायलॉगबाजी बघायला मिळेल. यामध्ये रितेभ विलनच्या भूमिकेत असणार आहे ज्याचा डार्क ह्युमर तुम्हाला पाहता येईल.' 

याशिवाय अभिनेत्री रकुल प्रित सिंहदेखील एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती नुकतेच 'दे दे प्यार दे' मध्ये अजय देवगणसह दिसून आली. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच त्याला जवळपास 1.6 लाख इतके व्ह्युज मिळाले. ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटासाठी उत्सुकता पाहायला मिळतेय. सिनेमा 8 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marjawan s trailer is out, siddharth and rithesh toghether again