ठुमकता सोंगाड्या पडद्याआड...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका साकारलेले मास्टर आब्बू ऊर्फ राजेखान वंटमुरीकर (वय ७७) यांचे निधन झाले.

कोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका साकारलेले मास्टर आब्बू ऊर्फ राजेखान वंटमुरीकर (वय ७७) यांचे निधन झाले. ४० वर्षे मेळा, नाटक, चित्रपटात विनोदी ढंगदार भूमिका साकारून त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. न्यू शाहूपुरीतील पाटणकर पार्क परिसरात घरीच त्यांचे निधन झाले.

मास्टर आब्बू कर्नाटकातील वंटमुरी गावचे. त्यांचे कुटुंबीय कोल्हापुरात स्थायिक झाले. कुमारवयात ते कोल्हापुरातील नाटक मेळ्यात काम करीत. त्यांचे काम दिग्दर्शक अनंत माने यांनी पाहिले आणि डॉ. व्ही. शांताराम यांच्या पिंजरा चित्रपटात संधी देण्यास सुचविले. वंटमुरीकर यांना पुढे ११० मराठी, दोन हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या ‘गावरान मेवा’ या नाटकांचे दीडशेहून अधिक दौरे त्यांनी केले. राजर्षी शाहू मालिकेसाठी त्यांनी निर्मिती व्यवस्था विभागात 
काम केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mastar Aabu Rajekhan Vantmurikar no more