esakal | दुसरं लग्न करणार का? मयुरी देशमुखचं विचारपूर्वक उत्तर

बोलून बातमी शोधा

Mayuri Deshmukh
दुसरं लग्न करणार का? मयुरी देशमुखचं विचारपूर्वक उत्तर
sakal_logo
By
स्वाती वेमूल

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखने 'इमली' या हिंदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. पतीच्या आत्महत्येच्या दु:खातून सावरत मयुरी आता कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. मयुरीचा पती आशुतोषने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नांदेड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रसंगातून कुटुंबीयांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या मदतीने मयुरी सावरली आणि पुन्हा एकदा ती अभिनयविश्वात खंबीरपणे उभी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मयुरी तिच्या खासगी आयुष्याविषयी मनमोकळेपणाने व्यक्त झाली. यावेळी दुसरं लग्न करणार का, या प्रश्नावर मयुरीने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत मयुरी म्हणाली, "२०२० हे वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या पूर्ण कुटुंबासाठी अत्यंत कठीण होतं. आशुतोष आमच्यापासून कायमचा दूर गेला. दु:खाचा डोंगरच माझ्यावर कोसळला होता. पण त्यातून सावरणंही तितकंच महत्त्वाचं होतं. अनेकांनी त्यात माझी मदत केली. माझं आजही आशुतोषवर प्रचंड प्रेम आहे. त्याच्यावरील प्रेमाच्या आधारे मी एकटं आयुष्य काढू शकते. आशुतोषला लहान मुलं खूप आवडायची. त्यामुळे मी आता मूल दत्तक घेण्याचा विचार करतेय. मला अनेकदा दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं जातं. पण मुलांसाठी दुसऱ्या लग्नाची काय गरज आहे?"

हेही वाचा : सोनालीची लग्नाची खास तयारी; चेहऱ्यासाठी घेतेय ट्रीटमेंट

मयुरी सध्या 'इमली' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती अभिनेता गश्मीर महाजनीच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. ‘तुम्हा सर्वांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी कृतज्ञ आहे. तुमच्या प्रेमातूनच प्रोत्साहन घेत मी नवीन सुरुवात करतेय’, असं तिने मालिकेची सुरुवात करताना म्हटलं होतं.