'लव्ह लग्न लोचा'मध्ये मयुरी वाघची एन्ट्री …

टीम ई सकाळ
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

झी युवावरील 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमध्ये सध्या बरीच धमाल सुरू आहे. आकांशा आणि श्रीकांत यांच्या लग्नाचा घोळ आणि विनय आणि गॅंग ने केलेली धमाल, अभिमान आणि शाल्मलीच्या आयुष्यात येणाऱ्या बाळाची चाहूल, राघव आणि काव्याचे प्रेम प्रकरण या सर्वांमुळे ही मालिका आणखीन रंगतदार घडत आहे . सुमित आणि सौम्या च्या एक्सिट नंतर त्यांच्या जागी आता, कोणी येणार की नाही या बद्दल प्रेक्षकांना शंकाच होती. मात्र आता लव्ह लग्न लोचा मध्ये एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे. ऋतू हे या नवीन पात्राचे नाव असून, सर्वांची लाडकी अभिनेत्री मयुरी वाघ ही भूमिका साकारणार आहे.

मुंबई : झी युवावरील 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमध्ये सध्या बरीच धमाल सुरू आहे. आकांशा आणि श्रीकांत यांच्या लग्नाचा घोळ आणि विनय आणि गॅंग ने केलेली धमाल, अभिमान आणि शाल्मलीच्या आयुष्यात येणाऱ्या बाळाची चाहूल, राघव आणि काव्याचे प्रेम प्रकरण या सर्वांमुळे ही मालिका आणखीन रंगतदार घडत आहे . सुमित आणि सौम्या च्या एक्सिट नंतर त्यांच्या जागी आता, कोणी येणार की नाही या बद्दल प्रेक्षकांना शंकाच होती. मात्र आता लव्ह लग्न लोचा मध्ये एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे. ऋतू हे या नवीन पात्राचे नाव असून, सर्वांची लाडकी अभिनेत्री मयुरी वाघ ही भूमिका साकारणार आहे.

ऋतू ही अतिशय स्मार्ट आणि अतिशय मॉडर्न मुलगी आहे आणि त्याचप्रमाणे ती सर्वांची आवडती सुद्धा बनणार आहे. तिच्या आयुष्यात तिचं स्वतःच करिअर सगळ्यात महत्वाचं असून तिला लग्न करण्याची इच्छा नाही आहे. सध्या लव्ह लग्न लोचा मध्ये काव्या ही सगळ्यात बिनधास्त कॅरेक्टर आहे पण ऋतू ही तिच्यापेक्षा जास्त बिनधास्त असणार आहे. ऋतू ही लेखिका असून ती वृत्तपत्र आणि मासिकांसाठी प्रेम, नातेसंबंध या विषयांवर लेख लिहीत असते मात्र यामधील कोणत्याही प्रकारची भावना आजपर्यंत तिने अनुभवली नाही आहे. आता ही ऋता आपल्या लव्ह लग्न लोचाच्या टीम मध्ये कशी फिट बसते हे बघणे महत्वाचे ठरेल . लव्ह लग्न लोचा ह्या मालिकेचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता झी युवावर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayuri wagh in Love lagn lochya esakal news