esakal | 'दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली' म्हणत अभिनेता विराजस कुलकर्णाने शेअर केला कोरोना काळातील अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

virajas kulkarni

'माझा होशील ना' फेम अभिनेता विराजस कुलकर्णीला देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता विराजसने कोरोनावर मात केली असून त्याचा या काळातील अनुभव सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

'दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली' म्हणत अभिनेता विराजस कुलकर्णाने शेअर केला कोरोना काळातील अनुभव

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- कोरोना व्हायरसचं संकट अजुनही संपलेलं नाही. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. यातंच 'माझा होशील ना' फेम अभिनेता विराजस कुलकर्णीला देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता विराजसने कोरोनावर मात केली असून त्याचा या काळातील अनुभव सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

हे ही वाचा: कृष्णा श्रॉफचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल, टायगर म्हणाला..    

‘माझा होशील ना’ या मालिकेत आदित्य नावाची भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. 'माझा होशील ना' या मालिकेमुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली. मात्र मध्येच विराजसला कोरोनाची लागण झाली आणि ही माहिती त्याने चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर अनेकांनी त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विराजसच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे त्याने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली. आणि या सोबतच या काळातील त्याचा कठीण अनुभव देखील शेअर केला. विराजसने लिहिलंय, “मागचे १० दिवस २ गोष्टी झाल्या – एक म्हणजे मी सोशल मिडियावरून गायब झालो होतो, आणि दुसरं – तुमच्या सगळ्यांच्या डीएम आणि कमेंट्सचा भडिमार होत होता… सगळ्यांना उत्तर देणं शक्य नव्हतं. जो त्रास व्हायचा होता तो संपलाय, आणि नशिबाने सुट्टीसाठी पुण्याच्या घरीच होतो. दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली, पण आता पुन्हा शूटींगसाठी सज्ज झालो आहे, आणि आपण टीव्हीवर आणि इथे भेटत राहूच,” अशी पोस्ट विराजसने केलीये. 

'माझा होशील ना' या मालिकेचं शूट मुंबईत सुरु होतं. मात्र, काही कामानिमित्त त्याला पुण्यात जावं लागलं आणि याच काळात त्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याने कोरोना चाचणी केल्यावर त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर लगेचच खबरदारी घेत त्याने स्वतःला आयसोलेट केलं.   

maza hoshil na fame actor virajas kulkarni shares his experience after fight with covid 19