esakal | 'माझा होशील ना'मध्ये नवीन ट्विस्ट; आदित्य देसाई विरुद्ध आदित्य देसाईचा सामना
sakal

बोलून बातमी शोधा

maza hoshil na

'माझा होशील ना'मध्ये नवीन ट्विस्ट; आदित्य देसाई विरुद्ध आदित्य देसाईचा सामना

sakal_logo
By
स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'माझा होशील ना' Maza Hoshil Na ही लोकप्रिय मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. प्रेक्षकांनी गेल्या काही भागात पाहिलं की जेडीने आदित्यवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यातून आदित्य जरी सुखरूप बचावला असला तरी आदित्यला आता त्याच्या भूतकाळाबद्दल आणि खऱ्या ओळखीबद्दल सांगायला हवं असं सगळ्या मामांना पटलंय. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत आदित्यला बसवण्यासाठी ब्रह्मेंनी एक पत्रकार परिषद भरवली आहे, ज्यात आदित्य देसाईची साऱ्यांशी ओळख करून देणं हा त्यांचा हेतू आहे. मात्र सई-आदित्यला याबद्दल काहीच कल्पना नाहिये आणि आयत्या वेळी काहीतरी घोळ होऊ शकतो ही भिती मनात घोळतेय. (maza hoshil na interesting twist in the story virajas kulkarni gautami deshpande slv92)

या प्रेस कॉन्फरन्समध्ये नवाच आदित्य देसाई सर्वांसमोर येतो आणि कंपनीवर हक्क सांगू लागतो. याने गोंधळात अजूनच भर पडते. नवा पेच तयार होतो, ज्यातून सुटणं कठीण आहे. आता या दोन आदित्य देसाईंमधला खरा आदित्य देसाई कोण आणि हा तोतया कोण हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा: सुयश ते शशांक; दुसऱ्यांदा प्रेमात पडले मराठी कलाकार

हेही वाचा: लिएंडर-किम शर्माच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धनची प्रतिक्रिया

आदित्यला सर्व सत्य कळेल का आणि त्याला आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत बसवण्यात मामा यशस्वी होतील का, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. मालिकेच्या पुढील भागांत आदित्य विरुद्ध आदित्य असा सामना रंगू लागेल अशी चिन्हं आहेत. या मालिकेत अभिनेता विराजस कुलकर्णी हा आदित्यची भूमिका साकारतोय तर अभिनेत्री गौतमी देशपांडे ही सईच्या भूमिकेत आहे.

loading image