esakal | 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

kajal kate

माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'माझी तुझी रेशीमगाठ' mazhi tuzhi reshimgaath ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील अभिनेता श्रेयस तळपदे Shreyas Talpade आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे Prarthana Behere यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या जोडीसोबतच चिमुकल्या मायरा वायकुळनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यातील आणखी एक व्यक्तीरेखा सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे शेफाली. नेहाची सहकारी आणि खास मैत्रीण शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे Kajal Kate साकारत आहे. काजलचं आयपीएलमधील IPL संघ मुंबई इंडियन्सशी Mumbai Indians खास कनेक्शन असल्याचं समजतंय.

काय आहे मुंबई इंडियन्सशी कनेक्शन?

काजलच्या पतीचं नवा प्रतिक कदम आहे. प्रतिक हा मुंबई इंडियन्स संघाच्या फिटनेस कोचचं काम पाहतो. टीममधील सर्व खेळाडूंना फिट ठेवण्याचं काम प्रतिक करतो. प्रतिक आणि काजलचं लग्न २०१८ मध्ये झालं. मुंबई इंडियन्स संघाची मोठी चाहती असल्याचं काजलने सांगितलं.

हेही वाचा: "जो स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार?"; स्नेहाचा आविष्कारला टोला

काजल ही मूळची नागपूरची आहे. डॉक्टर डॉन, स्वराज्यजननी जिजामाता अशा मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. शेफालीच्या भूमिकेविषयी ती म्हणाली, "ही भूमिका माझ्या करिअरला एक वेगळं वळण देणारी ठरली आहे. या भूमिकेमुळे लोक मला ओळखू लागले आहेत. अनेकजण मला मेसेज, कॉल करून आवर्जून प्रतिक्रिया कळवतात."

loading image
go to top