
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे.
मुंबई- छोट्या पडद्यावरील कमी कालावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका यातील काही खास पात्रांमुळे घराघरात पोहोचली. मग ती राधिका असो गुरु असो किंवा मग स्टायलिश शनाया. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. प्रेक्षकांसाठी यात अनेकदा ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. असाच एक ट्विस्ट आता पुन्हा एकदा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. चाहत्यांसाठी एक बातमी म्हणजे आता या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
हे ही वाचा: ‘तारक मेहता…’मध्ये ९ महिन्यांनंतर होणार नट्टू काकांची धमाकेदार एण्ट्री
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे. मालिकेतील शनाया ही सध्या रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटलं जात आहे.
मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारलं होतं. तिची भूमिका आणि स्टाईल प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजली होती. त्यानंतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकारली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली. आता मालिकेतील शनाया हे पात्रच वगळलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी प्रेक्षकांनी मात्र शनायाच्या एक्झिटविषयी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. तेव्हा शनाया हे पात्रंच निघून गेल्यानंतर मालिका कोणत्या वळणावर येऊन पोहोचणार हेच पाहायचंय.
mazya navryachi bayko fame shanaya aka rasika sunil exit the show again