‘तारक मेहता…’मध्ये ९ महिन्यांनंतर होणार नट्टू काकांची धमाकेदार एण्ट्री

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 21 December 2020

एकीकडे या मालिकेतील काही जुन्या कलाकारांनी शोचा निरोप घेतला तर काही नवीन कलाकारांनी एंट्री घेतली. लवकरंच या मालिकेत आणखी एका ज्युना पात्राची एंट्री होणार आहे. 

मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका जवळपास गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चाहत्यांच्या खास आवडीचं आहे .आता मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकीकडे या मालिकेतील काही जुन्या कलाकारांनी शोचा निरोप घेतला तर काही नवीन कलाकारांनी एंट्री घेतली. लवकरंच या मालिकेत आणखी एका ज्युना पात्राची एंट्री होणार आहे. 

हे ही वाचा: करणवीर बोहराच्या घरी चिमुकलीचं आगमन, व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक    

गेल्या ९ महिन्यांपासून नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक हे चाहत्यांना मालिकेत दिसत नव्हते. पण आता मालिकेत पुन्हा नट्टू काकांची एण्ट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वी नट्टू काकांची सर्जरी झाल्यामुळे ते मालिकेपासून लांब होते.

नुकताच मुलाखतीमध्ये त्यांनी ते पुन्हा मालिकेत एण्ट्री करणार असल्याचे सांगितले आहे. ‘आता माझी तब्बेत ठिक आहे. मी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचं शूटींग सुरु केलं आहे. १६ मार्च रोजी मी मालिकेच्या सेटवर शूटींग केलं होतं आणि आता ९ महिन्यांनंतर १६ डिसेंबर रोजी शूटींग पुन्हा सुरु केलं आहे. आता मी पुन्हा मालिकेत दिसणार आहे’ असं घनश्याम म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘जेव्हा लॉकडाउननंतर पुन्हा शूटींग सुरु झालं होतं तेव्हा ६० वर्षांपुढील कलाकारांना शूटींगसाठी परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर माझी एक सर्जरी झाली. आता माझी तब्येत ठिक आहे.’

tv nattu kaka is back to taarak mehta ka ooltah chashmah after 9 month  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tv nattu kaka is back to taarak mehta ka ooltah chashmah after 9 month