
Bigg Boss 16 चा विजेता ठरला एमसी स्टॅन.. ट्रॉफीच नाही इतकी मोठी रक्कम अन् बरंच काही खिशात टाकलं पठ्ठ्यानं
Bigg Boss 16: बिग बॉस 16 च्या विजेत्या संदर्भात जे-जे अंदाज लावले गेले होते ते सगळेच फेल ठरले. बिग बॉसचा विनर ना शिव ठाकरे बनला ना प्रियंका चाहर चौधरी. तर बिग बॉस सिझन 16 चा विनर ठरला पुण्याचा एम सी स्टॅन.
हो, एका झोपडपट्टीतून पुढे आलेल्या रॅपरनं अखेर बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. एमसी स्टॅनचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. शिव ठाकरे फर्स्ट रनर अप ठरला तर प्रियंका चाहर चौधरी सेकेंड रनरअप ठरली.
या सिझनमध्ये असं पहिल्यांदाच घडलं जिथे सगळ्यांचेच अंदाज फोल ठरले. एकीकडे प्रियंका चाहर चौधरीला घेऊन तर दुसरीकडे शिव ठाकरेला घेऊन मोठमोठे अंदाज लावले गेले होते. विनर या दोघांपैकीच एक होईल हे जवळपास कन्फर्म आहे असं वाटत असताना सगळं गणितच चुकलं.
एमसी स्टॅनच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगनं अखेर त्याला विजेतेपदावर नेऊन बसवलं. शो मध्ये तो असा एकमेव स्पर्धक होता जो शांत राहून फिनालेपर्यंत फक्त पोहोचला नाही तर त्यानं ट्रॉफी देखील पटकावली.(MC Stan wIn Bigg Boss 16 trophy-Prize Money)
एमसी स्टॅनचा बिग बॉसमधील प्रवास सगळ्यांपेक्षा खूप वेगळा राहिला आहे. तो कधी शांत तर कधी गरम डोक्यानं खेळताना दिसला. पण त्यानं आपली मैत्री पूर्ण ईमानदारीनं निभावली. शिव मंडलीचा पक्का मित्र अखेरपर्यंत तो बनून राहिला.
स्टॅनची एक गोष्ट चाहत्यांना खूप आवडली ती म्हणजे त्यानं जिथे मैत्री अखेर पर्यंत निभावली तशीच दुश्मनी देखील. शो मध्ये त्याचं अर्चनाशी अजिबात पटलं नाही..त्यानं शेवटपर्यंत तिच्याशी बोलणं टाळलं.
एमसी स्टॅनला बिग बॉस 16 चा विजेता म्हणून तब्बल ३1 लाख 80 हजाराची रोख रक्कम मिळाली. सोबत एक आलिशान गाडीचाही तो मालक बनला. आणि अखेर स्टॅनचं स्वप्न पूर्ण झालं. सलमान खाननं आपल्या हातानं त्याला पैशांचा चेक आणि गाडीची चावी तसंच बिग बॉसची ट्रॉफी दिली.
एमसी स्टॅन सुरुवातीपासून अखेरपर्यंत मंडलीसोबत राहिला. साजिद खान, अब्दू रोझिक आणि शिव ठाकरे सोबत स्टॅनची खूप चांगली मैत्री होती. त्या चौघांनी अखेरपर्यंत आपली मैत्री कायम ठेवली. आणि अनेकदा ते बोलताना दिसून आले की ही मैत्री या घराच्या बाहेरही कायम राहिल.
एमसी स्टॅन शो दरम्यान आपण झोपडीपट्टीमधनं आलो आहोत आणि नाव कमावलं आहे असं कायम म्हणताना दिसून आसा. स्टॅन खूप गरीब कुटुंबातून आला आहे. त्यानं रॅपर म्हणून स्वतःचं करिअर करताना खूप संघर्ष केला.
त्याचे वडील पोलिसात आहेत. आपल्या गर्लफ्रेंडमुळे तो कायम चर्चेत राहिला. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव बूबा आहे. जिच्यासोबत शो दरम्यान त्यानं बातचीतही केली होती. सलमानही अनेकदा बूबाचं नाव घेत स्टॅनची मस्करी करताना दिसून आला आहे.