‘मी वसंतराव’ ची हाफ सेंच्युरी! सूर प्रेक्षकांच्या काळजाला भिडला...

भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या गायकीनं श्रोत्यांना मुग्ध करणारे गायक म्हणून वसंतरावांचे नाव नेहमीच घेतले जाते.
Me vasantrao Movie
Me vasantrao Movie esakal

Marathi Movie: भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या गायकीनं श्रोत्यांना मुग्ध करणारे गायक म्हणून वसंतरावांचे नाव नेहमीच घेतले जाते. त्यांनी पारंपारिक शास्त्रीय गायिकेची व्याख्या बदलुन टाकलं. माझं घराणं हे (Maratahi Actor) माझ्यापासूनच सुरु होतं. असा संवाद मी वसंतराव चित्रपटामध्ये आहे. निपुण धर्माधिकारीनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण केले आहे. चित्रपटाने समिक्षकांकडून, प्रेक्षकांकडून आणि अनेक (Rahul Deshpande) मान्यवरांकडून वाहवा मिळवली. सध्या अनेक बॅालिवूड, दाक्षिणात्य, मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र या स्पर्धेत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाने पन्नासाव्या दिवशीही आपली जागा कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला आहे.

एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा यात दाखवण्यात आली असून प्रत्येकालाच आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक उर्जा देणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून पद्मविभूषण शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही पुढील वीस वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सांगितले. राहुल देशपांडेंमध्ये त्यांना वसंतरावांचा भास झाला. हा केवळ चित्रपट नसून यातून बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितले तर आपली संस्कृती किती श्रीमंत आहे, हे या चित्रपटातून कळते, अशी प्रतिक्रिया अभिनेता मकरंद देशपांडे यांनी दिली. हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट असून राहुलने वसंतराव अगदी हुबेहुब साकारल्याचे अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. याव्यतिरिक्त शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, केदार शिंदे, सचिन खेडेकर, आदित्य सरपोतदार, रवी जाधव, रेणुका शहाणे, अश्विनी भावे, अंकुश चौधरी, स्वप्नील बांदोडकर, वैदेही परशुरामी, गितांजली कुलकर्णी आदी नामवंतांनीही सकारात्मक प्रतिक्रया दिल्या आहेत.

अभिनेता राहुल देशपांडे म्हणतात, “ गुढीपाडव्याच्या शूभमुहुर्तावर ‘मी वसंतराव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत प्रेक्षकांनी या चित्रपटाला जे प्रेम दिले, त्यामुळेच हा टप्पा आम्ही गाठू शकलो. प्रेक्षकांच्या आजही चित्रपट पाहून प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे हुरूप वाढतो. चित्रपटाची संपूर्ण टीम आणि माझे कुटूंब, नातेवाईक यांच्यामुळेच मी वसंतरावांची भूमिका योग्यरित्या साकारू शकलो. त्यामुळे हे सगळं यशाचं श्रेय आम्हा सर्वांचं आहे.’’

Me vasantrao Movie
Panchayat 2 Review: लांबलेला पण खिळवून ठेवणारा प्रवास

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' हा काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Me vasantrao Movie
Audience Review: मी वसंतराव - संघर्षाचा सांगीतिक प्रवास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com