'मी वसंतराव' कान्सच्या महोत्सवात, राहुल देशपांडेंची पोस्ट व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vasantrao deshpande post

'मी वसंतराव' कान्सच्या महोत्सवात, राहुल देशपांडेंची पोस्ट व्हायरल

मुंबई - शास्त्रीय संगीतात आपल्या गायकीनं श्रोत्यांना भारावून टाकणारं नाव म्हणजे वसंतराव देशपांडे (vasantrao deshpande). त्यांनी आपल्या गायकीनं रसिकांच्या हृदयावर राज्य केलं. रागांची अनोखी मांडणी, त्यांचा व्यापक विचार, श्रोत्यांपुढे सादर करणारे गायक म्हणून त्यांचं नाव सर्वश्रृत आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निवड जगातील सर्वोत्तम अशा कान्स चित्रपट (cannes film festival) महोत्सवासाठी झालीय. अशी माहिती प्रसिध्द शास्त्रीय गायक आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे (rahul deshpande) यांनी सोशल मीडियावरुन दिलीय. (me vasantrao marathi movie selected in cannes film festival rahul deshpande post viral)

राहुल यांनी ही पोस्ट शेअर (social media) करताच त्यांच्यावर चाहत्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी आता लवकरात लवकर हा चित्रपट पाहण्याची इच्छाही व्यक्त केलीय. सध्या कोरोनामुळे चित्रपटगृहांवर बंधने आहेत. ही परिस्थिती ठीक झाल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित करावा असा प्रेमळ आग्रही यावेळी चाहत्यांनी राहुल यांना केला आहे.

हेही वाचा: यामी आदित्यचा फॅन्सवर 'सर्जिकल स्ट्राईक', गुपचूप उरकलं लग्न

हेही वाचा: अशोक सराफ यांना सायली संजीव का म्हणते 'पप्पा'?

पुढील महिन्यात कान्स येथे होणा-या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारकडून मी वसंतराव या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. अशा आशयाची पोस्ट राहुल यांनी लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणतात, हा संपूर्ण प्रवास आठ वर्षांचा होता. आमच्या मेहनतीला अखेर यश आले आहे. एक सकारात्मक प्रतिसाद यानिमित्तानं मिळाला आहे. या यशामध्ये संपूर्ण टीमचे योगदान आहे.