esakal | सिद्धार्थच्या कुटूंबियांना कोणताही संशय नाही, डॉक्टर म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थच्या कुटूंबियांना कोणताही संशय नाही, डॉक्टर म्हणाले...

सिद्धार्थच्या कुटूंबियांना कोणताही संशय नाही, डॉक्टर म्हणाले...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झालं आहे. त्याचा हार्ट अॅटकनं मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र आता त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात डॉक्टरांनी त्याच्या मृत्युचे कारणही सांगितलं आहे. बिग बॉसच्या तेराव्या सीझनचा विजेता म्हणून सिद्धार्थची लोकप्रियता होती. त्यानं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा होता. असं सगळं असतानाही त्याच्या दैनंदिन वेळापत्रकाविषयीची माहिती सुत्रांनी दिली. तेव्हा त्याच्याबद्दल काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आतापर्यत त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल हाती न आल्यानं ठोस निर्णयाविषयी बोलणं पोलीस प्रशासनानं टाळलं होतं.

छातीत दुखायला लागल्याचे कळताच सिद्धार्थला मुंबईतील कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. त्यानं झोपताना काही गोळ्या घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याला जाग आली नसल्याचेही सुत्रांनी सांगितलं आहे. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता सिद्धार्थला जाग आली तेव्हा त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानं त्याविषयी आईला सांगितलं. आईनं त्याला पाणी देऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र सकाळी सिद्धार्थला जाग आली नाही. त्याच्या आईनं त्याला जेव्हा जागं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं काहीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी सिद्धार्थला रुग्णालयात नेण्यात आलं.

गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास कुपर हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून सिद्धार्थला नेण्यात आले होते. त्यानंतर सव्वा दहा वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या शरीराची तीन वेळा तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याविषयी कोणतीही वेगळी माहिती समोर आली नसल्याचे सांगण्यात आले. त्या रुग्णालयाचे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याच प्रकारची इजा आढळली नाही. आता नव्यानं हाती आलेल्या माहितीनुसार, साधारण दुपारी पावणे चारच्या सुमारास त्याचा शवविच्छेदनचा अहवाल हाती आला. याबाबत इंडिया टूडेनं सविस्तर वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: सिद्धार्थ शुक्लाची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट; सोशल मीडियावर व्हायरल

हेही वाचा: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन; पाहा व्हिडिओ

त्या शवविच्छेदनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. त्याविषयी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची केस ही फार संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्याच्या शरीरावर जखमांच्या कोणत्याही खुणा नसल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यानंतर सिद्धार्थच्या कुटूंबियांचा जबाबही नोंदविण्यात आला आहे. त्या शवविच्छेदनाच्या अहवालावर सिद्धार्थच्या कुटूंबियांनी कोणताही आक्षेप घेतला नसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे पार्थिव त्याच्या कुटूंबियांकडे देण्यात आले. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहे.

loading image
go to top