esakal | सिद्धार्थ शुक्लाची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट; सोशल मीडियावर व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थ शुक्लाची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट; सोशल मीडियावर व्हायरल

सिद्धार्थ शुक्लाची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट; सोशल मीडियावर व्हायरल

sakal_logo
By
नामदेव कुंभार

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं गुरुवारी हृदयविकाराने निधन झालं. तो 40 वर्षांचा होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सिद्घार्थला उपचारासाठी मुंबईतील कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारावेळी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा कुटुंब आहे. सिद्धार्थने 'बालिका वधू' आणि 'दिल से दिल तक' यासारख्या मालिकामध्ये काम केलं होतं. तर 'झलक दिखला जा 6', 'फिअर फॅक्टर', 'खतरों के खिलाड़ी' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.

सिद्धार्थ शुल्काच्या निधनाच्या वृत्तनंतर चित्रपटश्रृष्टीमध्ये शोककळा पसरली असून कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सिदार्थने केलेली अखेरची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सिद्धार्थने 24 ऑगस्ट रोजी अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट करत फ्रंटलाइन वर्कर्सला धन्यवाद म्हटलं होतं. #MumbaiDiariesOnPrime आणि #TheHeroesWeOwe असे हॅशटॅग वापरत सिद्धार्थने पोस्ट केली होती. यामध्ये सर्व फ्रंटलाइन वर्कर्सच्या कामाचं कौतुक केलं होतं. सिद्धार्थ शुल्काची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: विणाबद्दल अश्लिल शब्दांचा वापर, शिव ठाकरेने घडवली अद्दल

सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जाने पहचाने से.. ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.

loading image
go to top