Flashback: 'मीनाकुमारीला रोज गुलाबाचं फुल घेऊन जायचे पण...'|Meena kumari Bollywood actress Flashback | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flashback meena kumari story

Flashback: 'मीनाकुमारीला रोज गुलाबाचं फुल घेऊन जायचे पण...'

Meena Kumari Love story: मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींसाठी लव अफेअर हे काही नवीन नाही. त्यांच्यासाठी अफेअर असणं ही काहीशा गर्वानं सांगण्याची (Bollywood News) आणि मिरवण्याची गोष्ट असल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या लवस्टोरी या फेमस झाल्या आहेत. त्यामुळे ते सेलिब्रेटी जास्त प्रकाशझोतात आले आहे. 70 आणि 80 च्या दशकातील लवस्टोरी या (entertainment news) आताच्या पिढीला माहिती नाही. मात्र त्यातील काहींच्या लवस्टोरी भन्नाट होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारी आणि सावन कुमार टाक यांच्यातील अनोखं नातं हे नेहमीच अनेकांसाठी गुढ होतं. त्यांनी या रिलेशनवर अनेकदा बातचीतही केली आहे. खासकरुन ती गुलाबाची गोष्ट चर्चेचा विषय होती.

1972 मध्ये मीनाकुमारी यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांचे निर्माता आणि दिग्दर्शक सावन कुमार यांच्यातील गुलाबी बंध हा कायम चाहत्यांसाठी हळवा कोपरा होता. असे सांगितले जाते. 25 ऑगस्ट 2022 मध्ये सावन कुमार टाक यांचे निधन झाले. दीर्घ आजारानं ते पीडित होते. त्यात त्यांचा मृत्यु झाला. मात्र त्यांची लवस्टोरी नेहमीच कुतूहलाचा विषय होती. ते प्रेम हे त्यागाचे प्रतिक होते. असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे होते. त्या प्रेमामध्ये स्वार्थाची भावना नव्हती. त्यामुळेच की काय अजुनही बॉलीवूडमध्ये त्यांचे उदाहरण नेहमीच सांगितले जाते. या लवस्टोरीची सुरुवात कशी झाली हे आपण जाणून घेणार आहोत.

सनम बेवफा, चांद का तुकडा आणि सावन द लव सीझन सारखे चित्रपट तयार करणाऱ्या सावन कुमार टाक आणि मीना कुमारी यांची लवस्टोरी ही नेहमीच चर्चेचा विषय असते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावनकुमार हे मीना कुमारीला रुहानी इश्क असे म्हणायचे. त्यांच्यात वयाचे मोठे अंतर होते. मात्र प्रेमात वयानं काही अंतर आले नाही. 2015 मध्ये झालेल्या एका मुलाखतीमध्ये सावन कुमार यांनी अनेक गोष्टीवर दिलखुलासपणे बातचीत केली होती. मीनाकुमारीला रक्ताच्या उलट्या व्हायच्या. त्यावेळी तिची काळजी घेतली. आमचं प्रेम हे शब्दांत व्यक्त करता येणारं नाही.

हेही वाचा: Laal Singh Chaddha: 'मैंने कहा था एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे!' चतूरच्या मीम्सचा कहर

प्रेमाला काही अंत नाही. मी त्यांच्यासाठी रोज गुलाबाचे फुल घेऊन जायचो. मला माहिती होते की, त्यांचे आजारपण काही लवकर संपणारे नाही. अशावेळी मी त्यांन माझ्या पद्धतीनं जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करुन आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करायचो. मीनाकुमारी या कायम आजारपणात असायच्या. त्यांना गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न मी करायचो. मीनाकुमारी या मोठ्या सेलिब्रेटी होत्या. स्टार होत्या. त्यामुळेच की काय त्यांच्याभोवती कायम चाहत्यांचा गराडा असायचा. त्यांची विचारपूस करण्यासाठी मोठी गर्दी असायची. अशावेळी मला बराचकाळ वाट पाहावी लागत असे. ही आठवण सावनकुमार यांनी सांगितली होती.

हेही वाचा: Viaan Shetty: शिल्पा शेट्टीचा 10 वर्षांचा विहान झाला बिझनेसमन, स्टार्ट अप सुरु!

गुलाबाची गोष्ट मात्र आमच्या दोघांसाठी वेगळेपण ठरवणारी होती. मी तिला कायम गुलाब देत आलो. तिला गुलाबाची फुलं आवडायची. त्यामुळे मी सतत वेगवेगळ्या रंगाची फुलं तिच्यासाठी घेऊन जायचो. पण कायम आजारपणात असलेल्या मीनाकुमारीनं फार कमीवेळा त्याविषयी माझ्याशी बोलणं केलं असेल. त्या कायम वेगळ्याच मनस्थितीत असायच्या. गुलाबाचे फूल आम्हाला जोडणारा दुवा होता. अशी भावना सावन कुमार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Malaika Arora: साजिरी, गोजिरी मलायका नव्या ढंगात!

Web Title: Meena Kumari Bollywood Actress Flashback Love Story With Director Savana Kumar Tak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..