बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीला खाजगी फोटोंवरुन करत होता ब्लॅकमेल, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मुंबईमधील एक तरुण बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीला तिचे खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणाला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने गुरुवारी अटक केली आहे.

मुंबई- मुंबईमधील एक तरुण बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीला तिचे खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणाला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने गुरुवारी अटक केली आहे. हा तरुण अभिनेत्याच्या मुलीला पैसे न देण्यावरुन फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत होता. 

हे ही वाचा: सुशांत सर आजारी असायचे आणि रिया मॅडम पार्टी करायच्या- सुशांतच्या बॉडीगार्डचा खुलासा

रिपोर्टनुसार, आरोपीचं नाव कुमैल हनीफ पठानी असं असून तो मुंबईतील मालाडमध्ये राहणारा आहे. या तरुणाला गुन्हे शाखा युनिट ११ द्वारे अटक करण्यात आली आहे. तसंच भादविच्या विविध कलमांअंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये महिलेचा अपमान करणं आणि जबरदस्ती वसूली करण्यासारखे आरोप आहेत. आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. 

आश्चर्याची बाब म्हणजे, आरोपीची बहीण त्याच कॉलेजमध्ये शिकत होती जिथे ही पिडीत तरुणी शिकते. दोघीही एकमेकींना चांगल्याप्रकारे ओळखत होत्या. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, नुकतंच तिला इंस्टाग्राम अकाऊंटवर मेसेजेस मिळाले होते. ज्यामध्ये आरोपीने सांगितलं की तो तिला कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखत होता आणि त्याच्याजवळ तिचे काही खाजगी फोटो होते.

या प्रकरणात तपास करणा-या अधिका-याचं म्हणणं आहे की, 'आरोपीने सोशल मिडियाच्या माध्यमातून पिडित तरुणीला मेसेज पाठवले होते आणि लगेचच डिलीट देखील केले होते कारण त्याच्याविरोधात काही पुरावे मिळू नयेत. आरोपी कुमैलने अभिनेत्या मुलीला हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने तिला फोन करुन पैश्यांची मागणी केली होती.'  

man held for blackmailing bollywood actors daughter with her private photos on social media  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man held for blackmailing bollywood actors daughter with her private photos on social media