esakal | साऊथ मेगास्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

chiranjeevi

अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही वेळापूर्वीच केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली.

साऊथ मेगास्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटीव्ह

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- साऊथचे सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही वेळापूर्वीच केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली. चिरंजीवी यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. सोशल मिडियावर ह्रशटॅग चिरंजीवी ट्रेंड होतोय. चिरंजीवी मेगास्टार या नावाने प्रसिद्ध आहेत याचं कारण म्हणजे त्यांचे जबरदस्त आणि रेकॉर्डब्रेक सिनेमे.

हे ही वाचा: महेश मांजरेकरांनी केली ड्रीम प्रोजेक्टची सुरुवात

चिरंजीवी यांनी ट्विट करत म्हटलंय, ''आचार्यची शुटींग करण्याआधी मी कोरोना टेस्ट केली होती. माझ्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मला कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणं नाहीयेत. आता मी होम क्वारंटाईन आहे. गेस्या ४ ते ५ दिवसात माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्या. माझ्या तब्येती विषयीची अपडेट्स मी देत राहीन.''

चिरंजीवी यांच्या या ट्विटनंतर सगळेच आपल्या अण्णा (मोठा भाऊ) ठिक व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत. चाहत्यांनी त्यांना त्यांची काळजी घ्यायला सांगितल्याचे अनेक ट्विट समोर येत आहेत. नुकतंच अभिनेते चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. याचे फोटो देखील त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले होते. चिरंजीवी आगामी 'आचार्य' सिनेमामुळे खुप चर्चेत आहेत. याशिवाय 'चिरु १५२' हा सिनेमा देखील ते चाहत्यांसाठी घेऊन येणार आहेत.   

mega star chiranjeevi tested positive for covid 19 he is home quarantine