
मुंबई ः लाॅकडाऊनमुळे काही जणांनी नोकरी गमावली आहे. काही जणांना आर्थिक टंचाईचा प्रचंड सामना करावा लागत आहे. सध्याची परिस्थिती सगळ्यांसाठी आव्हानात्मक आणि कठीण आहे. अशा वेळी आपण सर्वांनी एकमेकांची काळजी घेणे आवश्यक आहे. या कठीण परिस्थितीतून सामना करताना मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्माने दिला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक सरस चित्रपट करणाऱ्या अनुष्का शर्माने निर्माती बनून वेगळ्या धाटणीचे सिनेमे काढले. त्यानंतर वेबसीरीजसारख्या नव्या माध्यमाकडे ती वळली. पाताल लोक आणि बुलबुल या दोन वेबसीरीज तिने बनविल्या. अनेक नवोदितांना तिने आपल्या प्रोजेक्टमध्ये संधी दिली. त्यांनीही कमालीचा अभिनय करून तिचा विश्वास सार्थ ठरविला. ती म्हणते की कोरोना महामारमुळे प्रचंड नुकसान झालेला हिंदी चित्रपट उद्योग लवकरच सावरेल. बॉलिवूडमधील चित्रीकरणाची कामे ठप्प झाली असली तरी ती पूर्ववत होण्यास लवकरच सुरुवात होईल. चित्रपट उद्योग नेहमीच कलाकार आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी आग्रही असतो. सध्याच्या वातावरणाचा विचार करता सेटवरील परिस्थिती वेगळी राहणार असली तरी आम्हा सर्वांना हे आव्हान स्वीकारावेच लागेल. या साथीच्या आजाराच्या वेळी आम्ही सर्वांनी एकमेकांची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. हिंदी फिल्म इंडस्ट्री या नवीन आव्हानाचा यशस्वीपणे सामना करू शकेल. कोरोना साथीमुळे अनुष्का खूपच अंतर्मुख बनली आहे. तिने पुढे सांगितले की, “सध्या वर्तमानात जगणे हेच मी उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे मी शांत राहू शकते. ज्या क्षणाला मी भविष्याविषयी विचार आणि नियोजन करू लागते तेव्हा मला स्वतःला वर्तमानातच आणावे लागते आणि सध्याच्या परिस्थितीची जाणीव होते.”
विवाहानंतर गेल्या तीन वर्षात घडलेल्या घडामोडींविषयी अनुष्का अतिशय आनंदी समाधानी असून या दरम्यान तिने काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील संतुलन अतिशय योग्य पद्धतीने सांभाळले आहे. तिला अभिनय आणि निर्मितीच्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहेच. परंतु त्यासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे पुरेसा वेळ देणेही शिकून घेतले असल्याचे ती सांगते. अनुष्काने सांगितले की, मानसिक समाधान ही सध्याच्या काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या तीन वर्षात मी अतिशय अंतर्मुख बनले आहे आयुष्यात कमावलेल्या भौतिक गोष्टींबाबत विचार करणे मला आवश्यक वाटत नाही. मानसिक समाधान हेच नेहमी माझे प्रथम प्राधान्य राहत असते
--------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.