'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे परीक्षक ओव्हर अँक्टिंगमुळे ट्रोल

'उत्तम अभिनय बघायचा असल्यास सारेगमप लिटिल चॅम्प्सला पर्याय नाही'; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Mentors of Sa Re Ga M Pa Little Champs
Mentors of Sa Re Ga M Pa Little Champsfile image

सध्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'चे (Sa Re Ga M Pa Little Champs)' नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. तब्बल १२ वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या सा रे ग म प लिटिल चॅम्प्स शोची विजेती कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad), इतर स्पर्धक रोहित राऊत (Rohit Raut), मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan), प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि आर्या आंबेकर (Aarya Ambekar) हे सध्याच्या पर्वात मेंटॉरच्या भूमिकेत दिसत आहेत. या शोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काही जण या शोमधील छोट्या गायकांच्या गायकीचे कौतुक करत आहेत. तर काही नेटकरी मात्र या शोच्या मेंटॉर्सला ट्रोल करत आहेत.(Mentors of Sa Re Ga M Pa Little Champs are currently being trolled on social media due to his over acting)

सोशल मीडियावर सध्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या शोच्या मेंटॉर्संना त्यांच्या ओव्हर अँक्टिंगमुळे ट्रोल केले जात आहे. या शोमधील मेंटॉर कार्तिकी गायकवाडची तुलना हिंदी गायिका नेहा क्ककरसोबत केली जात आहे. शोमध्ये कार्तिकी सतत रडते किंवा भावनिक होते. हिंदी शो इंडियन आयडॉलमध्ये देखील नेहाला अशाच कारणामुळे ट्रोल केले जाते होते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेहा आणि कार्तिकीचे मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. या शोमधील मेंटॉर प्रथमेश लघाटेला 'महेश काळे यांची कॉपी करत आहे' असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तसेच आर्या आंबेकर आणि रोहित राऊतच्या परिक्षणावरील अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mentors of Sa Re Ga M Pa Little Champs
'गोपी बहू'चा बोल्ड अंदाज; बेली डान्स व्हिडीओ व्हायरल

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मणी देशपांडे करत आहे. या नवीन पर्वामध्ये कोणतेही एलिमिनेशन होणार नाही. त्यामुळे छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचे कोणतेही दडपण नसेल. स्पर्धेत सहभागी झालेल्या 14 गायक-गायिकांना महाअंतिक सोहळ्यासाठी तयार केले जाणार आहे.

Mentors of Sa Re Ga M Pa Little Champs
अचानक बंद करण्यात आल्या 'या' मराठी मालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com