Met Gala 2023Vral Video: झुरळ म्हणतयं मला रॅम्प वॉक करायचा...

Cockroach At Met Gala 2023:
Cockroach At Met Gala 2023:Esakal

फॅशन आणि ग्लॅमरचा वर्षातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट, Met Gala 2023 न्यूयॉर्क शहरात सुरू झाला आहे. या कार्यक्रमात जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर जोरदार पोज दिली.

या वर्षी, आलिया भट्टपासून प्रियांका चोप्रा, इशाना अंबानी आणि नताशा पूनावालापर्यंत भारतीय कलाकारांनी हजेरी लावली. फॅशन आणि डिझायनर्सची कला दाखवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे.

अनोख्या फॅशनची आवड असणाऱ्यांसाठी हा मोठा कार्यक्रम एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात, जेथे हॉलीवूडपासून इतर उद्योगांपर्यंतचे सर्वच तारे ग्लॅमरचा अविष्कार करतात.

या फॅशन शोचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व व्हायरल होत आहेत. यादरम्यान, असाच एक पाहुणा रेड कार्पेटवर कॅमेऱ्यात कैद झाला होता, जो न बोलवता आला अन् सर्वाचं लक्ष वेधुन गेला.

Cockroach At Met Gala 2023:
Balasaheb Thackerey : मराठी सिनेमाला थिएटर मिळत नव्हतं, बाळासाहेब ठाकरे दादा कोंडकेंच्या पाठीशी उभे राहिले अन्..

सेलिब्रिटी आणि कलाकारांनाही मेट गालाचे आमंत्रण मिळवणे खूप कठीण आहे. पण या वर्षी एक झुरळ इतक्या मोठ्या ग्लॅमरस इव्हेंटमध्ये सहजासहजी पोहोचला आणि ट्विटरवर सोशल मिडियावरची लाईमलाईट घेवुन गेला. मेट गाला कार्पेटवर सापडलेल्या झुरळाचा व्हिडिओ व्हायरल झाला

या भव्य कार्यक्रमात रेड कार्पेटवर अनेक कलाकार त्यांच्या डिझायनर आउटफिट्समध्ये पोझ देत होते अन् तितक्यात सेलिब्रिटींमध्ये एक झुरळ देखील फिरताना दिसला. गाला इव्हेंटच्या रेट कार्पेटवर झुरळ कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहे.

Cockroach At Met Gala 2023:
Priyanka Chopra: एक नंबर जोडी! देसी गर्लनं नवऱ्यासोबत Met Gala 2023 फॅशन शोमध्ये केली हवा...

तर गाला इव्हेंटच्या रेड कार्पेटवर दिसलेल्या झुरळाच्या व्हिडिओला केवळ लाइक्स आणि कमेंट मिळत नाहीत तर ट्विटरवर मीम्सचा पाऊसही आला आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Cockroach At Met Gala 2023:
Met Gala 2023 : जगातील सगळ्यात मोठा फॅशन इवेंट इतका खास का असतो? जाणून घ्या इवेंटच्या रंजक गोष्टी

पेनेलोप क्रुझ, मायकेला कोएल, रॉजर फेडरर, डुआ लिपा आणि व्होग संपादक अण्णा विंटूर यांनी होस्ट केले आहे. हा कार्यक्रम मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो आणि अतिथींमध्ये अभिनेते, संगीतकार, मॉडेल आणि फॅशन उद्योगातील व्यक्तींचा समावेश आहे.

मेट गाला दरवर्षी आयोजित केला जातो जो जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटपैकी एक आहे. यावेळी मेट गाला 2023 ची थीम दिवंगत फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्ड यांना समर्पित आहे. त्याला 'कार्ल लेजरफेल्ड - अ लाइन ऑफ ब्युटी' असं नाव देण्यात आलं आहे.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com