Balasaheb Thackerey: मराठी सिनेमाला थिएटर मिळत नव्हतं, बाळासाहेब ठाकरे दादा कोंडकेंच्या पाठीशी उभे राहिले अन्..

टीडीएमचा दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडेच्या चित्रपटाला थिएटर न मिळाल्यानं मोठ्या वादाला सुरुवात झाली होती.
Balasaheb Thackerey
Balasaheb Thackerey

Balasahab Thackeray Dada Kondke Songadya : आज बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन. काही महिन्यापुर्वी टीडीएमचा दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडेच्या चित्रपटाला थिएटर न मिळाल्यानं मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. भाऊनं तर चिंताग्रस्त होत सध्याच्या परिस्थितीवर खंत व्यक्त केली. मराठी चित्रपटांना थिएटर न मिळणे ही काही आजची गोष्ट नाही. यापूर्वी देखील अशी परिस्थिती मराठी चित्रपटांवर ओढावली होती. सोशल मीडियावर अशाच एक गोष्टीचा संदर्भाची नेटकऱ्यांना आठवण करुन दिली जात आहे.

ज्यांनी कुणी अभिजित पानसे दिग्दर्शित ठाकरे नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना त्यातील प्रसिद्ध कलावंत, दिग्दर्शक दादा कोंडकें यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंकडे एक तक्रार केली होती. त्यामध्ये दादांनी त्यांच्या सोंगाड्या चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याचे बाळासाहेबांना सांगितले होते. त्यानंतर बाळासाहेबांनी जे काही केले ते सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेबांनी दादा कोंडके यांना केलेले सहकार्य हे त्यावेळच्या मराठी मनोरंजन विश्वासाठी मोठी घटना होती.

Also read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सध्या मराठी मनोरंजन विश्वात मराठी चित्रपटाविषयी जे काही होते आहे त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होताना दिसते आहे. मुद्दा केवळ टीडीएम पुरताच नाहीतर यापूर्वी देखील काही मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची तक्रार काही मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी केल्याचे दिसून आले. त्याची दखल काही संघटनांनी केली खरी मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता पुन्हा एकदा थिएटरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Balasaheb Thackerey
Salman Khan : 'महिलांनी पदर सांभाळलेलाच बरा, नाहीतर..!'

मराठी चित्रपटांचे वितरण, त्याचे मार्केटिंग ज्याप्रकारे व्हायला हवे तसे ते होताना दिसत नाही. त्यामुळे की काय मराठी चित्रपटांना पुरेशा प्रमाणात थिएटर मिळण्यास अडचण होत असल्याचे दिसून आले. यासगळ्यात बाकीच्या कलाकारांनी देखील मराठी दिग्दर्शक, निर्माता यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्हायरल होताना दिसत आहे.

Balasaheb Thackerey
Shah Rukh Khan: दिल्ली उच्च न्यायालयाचा शाहरुख खानला मोठा दिलासा! काय आहे प्रकरण

याप्रसंगी मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध नाव दादा कोंडके यांच्या सोंगाड्या चित्रपटाला थिएटर मिळत नव्हते. अशावेळी दादांनी थिएटर मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले मात्र थिएटर चालकांनी कोणतीही दाद दिली नाही. त्यावेळी दादांनी बाळासाहेबांकडे त्यासंबंधी खंत व्यक्त केली. बाळासाहेबांनी तातडीनं त्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित थिएटर चालकाला समज देत सोंगाड्या चित्रपट थिएटरमध्ये लावण्यास भाग पाडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com