
'मी पुन्हा येईन..' हा ट्रेलर पाहून बघा काही आठवतंय का?
mi punha yein : प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या राजकीय व्यंगचित्र असणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाआहे. या ट्रेलरला उंदड प्रतिसाद मिळाल्याने ही वेब सिरिज काढीपासून सुरू होणार याची उत्कंठा साऱ्यांना लागली होती. अखेर याची घोषणा झाली असून २९ जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही वेबसिरिज पाहता येणार आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. (mi punha yein trailer released)
(mi punha yein planet marathi political web series will release on 29 july)
ट्रेलरमधील जबरदस्त संवाद, विनोदी किस्से प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे आहेत. राजकारणातील अस्पष्ट बाजूचे व्यंगात्मक चित्रण पहिल्यांदाच मराठी सीरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न ‘मी पुन्हा येईन’मधून करण्यात आला आहे. प्रत्येक क्षणी डोळ्यांत अंजन टाकणारी, विचार करण्यास भाग पाडणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांचे मनोरंजनही करणारी आहे. राजकारणातील नाटकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने, विनोदाची अचूक वेळ साधत अधिकच रंगत आणली आहे.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ आम्ही नेहमीच आमच्या ओटीटीवर उत्तमोत्तम आणि नवीन आशय देण्याच्या प्रयत्न केला आहोत. ‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबविश्वासाठी एक वेगळी संकल्पना आहे आणि मला या गोष्टींचा विशेष आनंद आहे की, ही मनोरंजनात्मक सीरीज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठीवर पाहाता येणार आहे.’‘
‘मी पुन्हा येईन’ बद्दल लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, ‘’ प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही सर्वोत्तम प्रतिक्रिया असते. आता ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. बहुमतासाठी पक्षाची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, कारस्थाने सत्तेसाठी कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्रण ‘मी पुन्हा येईन’मध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणाचे काही खरे नाही, हेच खरे आहे, हे हसतखेळत सांगणारी ही सीरीज आहे. मला खात्री आहे, हे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईलच याशिवाय यातील मनोरंजक ट्विस्ट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.’’
Web Title: Mi Punha Yein Trailer Released Planet Marathi Political Web Series Will Release On 29 July
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..