Middle Class Love Story : ‘मिडल क्लास लव्ह स्टोरी’ चित्रपटाला बी-टाऊनकडून प्रतिसाद

चित्रपट कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाला पाहावसा वाटेल असा आहे
Middle Class Love Story News
Middle Class Love Story NewsMiddle Class Love Story News

Middle Class Love Story News मध्यमवर्गीय असणे वाईट नाही. परंतु, स्वप्न आहे श्रीमंत होण्याची. यावर आधारित ‘मिडल क्लास लव्ह स्टोरी’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपट निर्मात्या रत्ना सिन्हा हिचा नवीनतम चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या बी-टाऊन सेलिब्रिटींसह सर्व स्तरातून टाळ्या आणि कौतुक केले गेले. तसेच अनेक स्टार्स चित्रपटाबद्दल आपापले मत मांडताना दिसले.

हा चित्रपट कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाला पाहावसा वाटेल असा आहे, अशी तापसी पन्नू (Taapsee Pannu) म्हणाली. तर राजकुमार रावला हा चित्रपट ऊर्जेने भरलेला वाटला. हा चित्रपट एका मसुरी मुलाची कथा सांगते. युवी (प्रीत कमानी) जो मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. त्याचे वडील (मनोज पाहवा) बँक व्यवस्थापक आहे. तर आई (सपना वाळू) टिफिन सेवा चालवते. युवीला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हवी आहे. ज्यामुळे तो श्रीमंत होण्याची इच्छा ठेवतो.

Middle Class Love Story News
PM Narendra Modi Birthday : ‘या’ कलाकारांनी साकारली पंतप्रधानांची भूमिका

‘हा मस्त चित्रपट आहे. जो तुम्ही कुटुंबासह पाहू शकता. हा चित्रपट तुम्हाला हसायला लावेल. तसेच तुम्हाला खूप भावुक करेल. हिंदी चित्रपटसृष्टी हेच आहे’ अशी तापसी पन्नू म्हणाली.

उत्कृष्ट चित्रपट आहे. एकदा हा चित्रपट बघा तुम्ही नाराज होणार नाही, असा हिमेश रेशमिया म्हणाला. कलाकारांनी खरोखरच चांगले काम केले आहे, असा राजकुमार राव म्हणाला. २०१७ मध्ये रत्ना सिन्हासह काम केले आहे. आमच्या शुभेच्छा तिच्याबरोबर आहेत, असेही राजकुमार राव (Rajkumar Rao) म्हणाला. हा चित्रपट तरुण पिढीवर आधारित आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com