'महाराष्ट्र मराठी माणसांचा पण सिनेमांचा नाही', मिलिंद गवळींनी व्यक्त केली खंत... पोस्ट चर्चेत Milind Gawali milind gawali marathi actor aai kuthe kay karte fame shared post of his movie tejswini | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Gawali

Milind Gawali : 'महाराष्ट्र मराठी माणसांचा पण सिनेमांचा नाही', मिलिंद गवळी असं का म्हणाले?पोस्ट चर्चेत

मराठी मनोरजंन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून मिलिंद गवळी ओळखले जातात. ते सध्या आई कुठे काय करते मालिकेतून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत. त्याच्या मालिकेतील अनिरुद्ध या पात्रास प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत.

मालिकांबरोबरच मिलिंद हे सोशल मिडियावर खुप सक्रिय असतात. वेळोवेळी त्याच्या भावना ते पोस्टच्या माध्यमातुन चाहत्याप्रर्यंत पोहचवत असतात. नुकतच त्यांनी त्याच्या 'तेजस्विनी' या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

"तेजस्विनी" माझा डबल रोल, चित्रपट 90% पूर्ण, चित्रपटात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे अतिशय गोड व्यक्तिमत्व म्हणजे आनंद अभ्यंकर, मुंबई पुणे हायवे अपघातात गेले, निर्माते मस्के त्यांचं राहतं घर गहाण ठेवलं होतं हा चित्रपट करण्यासाठी,या चित्रपट शर्वरी जमिनीस , डॉक्टर विलास उजवणे असे कलाकार आहेत,

दिग्दर्शक सतीशराव रणदिवे यांच्याबरोबरचा माझा पाचवा का सहावा चित्रपट होता, आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केला हा चित्रपट पूर्ण करून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा पण काही गोष्टी आपल्या हातातच नसतात, प्रत्येक चित्रपटाचं आपलं नशीब असतं,

मराठी चित्रपट करणे हे एका निर्मात्यासाठी फार सोपी गोष्ट नाहीये, खूप कठीण परिस्थितीत तो चित्रपट तयार होत असतो, त्याच्या नशिबाने जर पूर्ण झालाच तर आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर्स त्याला हात लावत नाहीत, ज्या पद्धतीने इंग्रजी हिंदी दक्षिणात चित्रपटांना जसा रिस्पॉन्स देतात तसा मराठी चित्रपटांना मिळत नाही , producer ला स्वतः रिलीज करावा लागतो किंवा मग एखादा रिलीजिंग पार्टनर घ्यावा लागतो जो,

जो प्रोड्युसरला LIFO ( last In First Out ) सिस्टीम ने फसवतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांपेक्षा भोजपुरी नेपाळी चित्रपट जास्ती पैसा कमावतात, south च चित्रपट तर पैसा कमावतातच कमवतात, latest Pushpa Telugu, KGF & Kantara Kannada, फॉरेन फिल्म तर आहेतच महाराष्ट्रात थेटर मधनं खोर में खोर्याने पैसा कमवायला,

महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे. पण महाराष्ट्र मराठी सिनेमांचा नाही.

हे कटू सत्य आहे. Statistics काढले Research केला. तर किती मराठी प्रोड्युसर survive झाले आहेत, जगले आहेत किंवा जिवंत राहिले आहेत, (पैसे कमवणे तर लांबच राहिलं.) हा खरा आकडा जर लोकांसमोर आला , तर धक्का बसेल,

आणि मराठी चित्रपट चांगले नसतात किंवा वाईट असतात असं नाहीये, अतिशय सुंदर विषय सादरीकरण आणि उत्तम अभिनय , असलेले असंख्य चित्रपट येऊन गेले, मराठी प्रोडूसर मात्र जगला नाही,

" तेजस्विनी "चित्रपटाचे आमचे प्रोड्युसर मस्के यांचं राहतं घर जे गहाण होतं , ते कालांतराने कन्स्ट्रक्शनच्या धंद्यातून सोडून घेण्यात त्यांना यश मिळालं, त्या घरामध्ये तेजस्विनी चित्रपटाचे नऊ अतिशय उत्कृष्ट गाणी आणि 90% पूर्ण झालेला चित्रपट , कुठल्यातरी कोपऱ्यात पडला असेल."

अशा प्रकारे मेहनत घेवून,अतोनात कष्ट करुनही त्याचा हा चित्रपट रिलिज होऊ शकला नाही याची खंत अजूनही त्यांना सतावत आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रात मराठी चित्रपटाचं भयानक वास्तव मांडण्याचा प्रयत्न त्यानी त्यांच्या या पोस्टमधून महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना याची जाणिवही करुन दिली आहे.