Milind Gawali: ..आणि जीव मुठीत धरून मी हो म्हटलं... मिलिंद गवळी यांचा हा भन्नाट किस्सा चुकूनही चुकवू नका..

अभिनेता मिलिंद गवळी यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष..
Milind Gawali shared post about dance practice performance said nothing is impossible
Milind Gawali shared post about dance practice performance said nothing is impossible sakal

Milind Gawali: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत.

त्यांनी मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलंय. पन्नाशी उलटून गेली तरीही मिलिंद गवळी आजही फिट आणि हँडसम आहेत. शिवाय ते सोशल मीडियावर त्यांच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असतात.

आज त्यांनी एक खास पोस्ट केली आहे. की पोस्ट आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देणारी आहे. एखादी असाध्य गोष्ट आपण सहज काशी साध्य करू शकतो, हे मिलिंद गवळी यांनी अगदी सोप्या शब्दात सांगितलं आहे.

(Milind Gawali shared post about dance practice performance said nothing is impossible)

मिलिंद गवळी यांनी एक डान्स करतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे, आणि त्यावर एक कॅप्शन लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते लिहितात की. '' “प्रयत्नांती / प्रयत्नार्थी परमेश्वर”आपल्या लहानपणापासून आपल्या काही धारणा बनत जातात,प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा मनामध्ये घट्टपणे बिंबवून ठेवल्या जातात, आणि मग आयुष्यभर त्ते प्रामाणिकपणे त्याचं पालन करत राहतात'

'उदाहरणार्थ काही लोकांची स्वतःबद्दलची अशी धारणा असते की त्यांना आयुष्यात ड्राइविंग कधीच करता येणार नाही, मग ड्रायव्हिंग करायच्या ते कधी भानगडीतच पडत नाही, मग ड्रायव्हर आला नाही म्हणून त्याच्यासाठी दोन तास थांबणारी लोकही मी बघितले'

'आणि माझं उलट होत होतं ड्रायव्हर जर पाच दहा मिनिटे उशिरा आला तर मी गाडीत बसायचो आणि shooting लाल निघून जायचो आणि driver ला त्या दिवशी सुट्टीच द्यायचो, कदाचित म्हणुन बिचारे माझे प्रवीण आणि जितेश कधी उशिरा यायचे नाही.'

'पण माझ्या मनामध्ये लहानपणापासून वेगळीच धारणा किवा भिती बसली होती "मला नाचता येत नाही", त्यामुळे लग्नामध्ये वरातीत आणि गणपतीत जसे बिनधास्त नसतात कोणाचं कोणाला काही घेणं देणं नसतं तसा नाच मला येतो पण सिनेमातला नाच हा मला काही जमणार नाही असं माझ्या मनाने ठरवूनच टाकलं होतं आणि त्या पद्धतीनेच मी इतकी वर्ष वावरत होतो.'

पुढे मिलिंद गवळी यांनी लिहिले आहे की, ''अचानक स्टार प्रवाहने मला perform करायला सांगितलं, दिग्दर्शक वैभव घुगे यांना मी म्हटलं की माझ्या ऐवजी दुसरा कोणीतरी नाचणारा कलाकार घ्या म्हणजे तुमचं काम सोपं होईल, वैभव घुगे म्हणाले की आम्हाला तुम्हीच हवे आहात, मी म्हणालो पण मला नाचता येत नाही, ते म्हणाले ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त हो म्हणा.''

''जीव मुठीत धरून मी हो म्हटलं, complete घाबरलोच होतो.. कारण त्याआधी एका कोरिओग्राफरने मला humiliate केलं होतं. आता तो अनुभव परत नको वाटत. वैभव घुगे स्वतः एवढा विश्वास दाखवतोय म्हटल्यावर , आपण पण प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार करून उतरलो मैदानात.'

'बघा त्यानंतर तीन वेळा स्टार प्रवाह साठी मी perform केलं आहे.तर माझ्या सांगायचं उद्देश असा हा की ... प्रयत्न केले, आणि correct guide करणारा वैभव घुगे सारखा किंवा अनिल शिंदे सारखा तुम्हाला मिळाला सोहम सारखा तुम्हाला मिळाला तर काहीही अशक्य नाही आहे.'

'आज पर्यंत मला ज्यांनी ज्यांनी नाचवलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सुबल सरकार, नरेंद्र पंडित ,हबीबा, वैभव घुगे, अनिल शिंदे, शिवम वानखडे, कार्तिक पौल ... तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आली नसती तर कदाचित माझे पाय जमिनीवरून वर ऊठले नसते.'

'पण आता आयुष्यात प्रयत्न करायचे असं मी ठरवलेलं आहे. मग जे होईल ते होईल. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि मग बघा गोष्टी तुम्हाला साध्य होतात की नाही. होतीलच हो का नाही होणार..' अशा शब्दात मिलिंद गवळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com