मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि अभिषेक यांची खास मैत्री आहे.
Abhishek and Milind Gunaji
Abhishek and Milind GunajiInstagram
Updated on

प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी Milind Gunaji यांचा मुलगा अभिषेक गुणाजी Abhishek Gunaji याचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अभिषेकने गर्लफ्रेंड राधा पाटीलशी साखरपुडा केला. वडिलांप्रमाणेच अभिषेकसुद्धा चित्रपटसृष्टीत काम करतोय. अभिषेकने मुंबईतील रुईया कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी सक्रिय असून होणारी पत्नी राधासोबतचे काही फोटो त्याने पोस्ट केले आहेत.

अभिषेक आणि राधा यांचा साखरपुडा साधेपणानं पार पडला. या दोघांवर सोशल मीडियाद्वारे अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिषेक आणि राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांची खास मैत्री आहे. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. अभिषेकच्या इन्स्टाग्रामवरही अमित ठाकरेसोबतचे काही फोटो पहायला मिळतात.

Abhishek and Milind Gunaji
असा असेल विकी-कतरिनाच्या लग्नातील मेन्यू; पाहुण्यांसाठी पदार्थांची चंगळ

राधा आणि अभिषेक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. राधा ही मेडिकल क्षेत्रात काम करते. तर अभिषेक हा दिग्दर्शन क्षेत्रात आपलं नशीब आजमावतोय. त्याला फोटोग्राफीचीही खूप आवड आहे. 'छल' या लघुपटाचं दिग्दर्शन अभिषेकने केलं होतं. यामध्ये सुमित राघवन आणि मिलिंग गुणाजी यांनी भूमिका साकारल्या होत्या. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळालं होतं.

मिलिंद गुणाजी यांनी इंजीनिअरिंगची शिक्षण पूर्ण केलं होतं. पण एकदा अचानक त्यांना एका मोठ्या मॉडेलिंगच्या कामाची ऑफर आली. देवानं पर्सनॅलिटी दिल्यामुळं दिग्जाम या मोठ्या ब्रँडची जाहिरात मला मिळाली आणि माझ्या करिअरची दिशाच बदलली, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते. अभिषेकसुद्धा आय.टी. इंजीनिअर असून तो एम. एस. करण्यासाठी अमेरिकेत जाणार होता. पण त्याचवेळी एका मोठ्या दिग्दर्शकानं त्याला चित्रपटासाठी करारबद्ध केलं. ते दिग्दर्शक मिलिंद गुणाजी यांच्या ओळखीचे होते. मिलिंद यांनी दिग्दर्शकांना सांगितलं, ‘माझा आणि राणीचा मुलगा आहे म्हणून तुम्ही त्याला घेऊ नका, तर आधी तुम्ही त्याची ऑडिशन घ्या, मग ठरवा.’ अभिषेकनं ती ऑडिशन अतिशय उत्तम दिली आणि त्यानंतर त्याला करारबद्ध केलं गेलं. मधल्या काळात या चित्रपटाला काही कारणानं उशीर झाला; पण त्या काळात अभिषेकनं त्याच दिग्दर्शकांबरोबर साहाय्यक म्हणून काम केलं. ते केल्यानंतर त्याला दिग्दर्शनात रस निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com