'पूनमच्या वाटयाला गुन्हा, मिलिंदचं कौतूक कशासाठी'?

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 5 November 2020

सध्या पूनम पांडेला सार्वजनिक ठिकाणी बोल्ड शुट केल्याप्रकरणी गोव्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर मिलिंद सोमण याच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यावर असरानी यांना या ‘दुटप्पीपणा’ खटकला आहे.

मुंबई - पूनमने गोव्यातील एका सार्वजनिक ठिकाणी बोल्ड शुट केलं, तर दुसरीकडे मॉडेल आणि अभिनेला मिलिंद सोमणने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक 'हॉट' फोटो शेयर केला होता. आता त्या दोन्ही फोटोंवरुन वादाला सुरुवात झाली आहे. नेटक-य़ांनी या दोघांवरही टीका केली आहे. त्यात पत्रकार आणि लेखक अपूर्व असरानी यांनी प्रतिक्रिया देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या पूनम पांडेला सार्वजनिक ठिकाणी बोल्ड शुट केल्याप्रकरणी गोव्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर मिलिंद सोमण याच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यावर असरानी यांना या ‘दुटप्पीपणा’ खटकला आहे. अशा प्रकारावर त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे. मिलिंदने आपल्या 55 वा वाढदिवसाच्या निमित्ताने गोव्याच्या समुद्रकिनारी पळताना एक बोल्ड  धावतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

अपूर्व असरानी यांनी मिलिंद आणि पूनम दोघांचाही फोटो पोस्ट केला आहे. याप्रकरणी लोकांच्या दुटप्पी वागण्यावर प्रश्न उपस्थित केला. ‘अलीकडे पूनम पांडे आणि मिलिंद सोमण दोघांनीही गोव्यात कपडे उतरवले. पूनमने अर्धे तर मिलिंद अख्खे कपडे उतरवले. यानंतर पूनम पांडे कायद्याच्या कचाट्यात सापडली आणि मिलिंदला मात्र 55 च्या वयात इतका फिट दिसतो म्हणून त्याचे कौतूक झाले. माझ्या मते, महिलांच्या बोल्ड  होण्याच्या तुलनेत पुरूषांनी बोल्ड होण्याविषयीची आपल्या समाजातील मते अधिक उदार आहे, असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

गोव्यात अश्लिल व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी पोलिसांनी पूनम पांडेविरोधात एफआयआर दाखल केली. तिचा हा वादग्रस्त व्हिडीओ गोवा सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट करण्यात आला. या व्हिडीओवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. सध्या कोविडच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला कशी परवानगी दिली जाते असा आक्षेप घेण्यात आला होता. दुसरीकडे मिलिंद सोमणच्या फोटोला त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर लाईक केले आहे. 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind Soman gets love while FIR against Poonam Pandey Asrani commented