esakal | मिलिंद सोमणचा निश्चय! लवकरच करणार प्लाझ्मा डोनेट

बोलून बातमी शोधा

milind soman
मिलिंद सोमणचा निश्चय! लवकरच करणार प्लाझ्मा डोनेट
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फटका आजवर अनेक देशांना बसला आहे. याला भारतदेखील अपवाद नाही. आतापर्यंत सामान्यांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अनेक बऱ्याच सेलिब्रिटींनादेखील कोरोना झाल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूडचा फिटनेस फ्रिक अभिनेता मिलिंद सोमण यालादेखील कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु. मिलिंदने या विषाणूवर मात केली असून आता तो प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. मिलिंदने सोशल मीडियावर पोस्ट शेअर आता प्लाझ्मा दान करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

फिटनेसकडे विशेष लक्ष देणारा मिलिंद सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टीव्ह असतो. गेल्या काही काळापासून तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. विशेष म्हणजे त्याला कोरोना झाल्यानंतर याविषयी त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं होतं. त्यानंतर आता त्याने यशस्वीरित्या कोरोनावर मात केली असून १० दिवसांनंतर तो गरजुंना प्लाझ्मा देण्यास सज्ज होईल असं सांगितलं आहेत. एक व्हिडीओ शेअर करत त्याने ही माहिती दिली.

मिलिंदने इन्स्टाग्रामवर वर्क आऊट करतांनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत आहे. "आता मी पूर्णपणे बरा झालोय असं मला वाटतंय. त्यामुळे पुढील १० दिवसांमध्ये मी प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पूर्णपणे तयार असेन. कोरोनावर मात केलेल्या लोकांच्या रक्तातील प्लाझ्यामुळे अन्य गरजु रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शांतपणे जे शक्य असेल ते करा. स्वत:ची काळजी घ्या", असं कॅप्शन मिलिंदने या पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कोरोनावर मात केलेले व अन्य कलाकारही गरजु रुग्णांची मदत करत आहेत. यामध्येच लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांनीही मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये ७ लाख रुपयांची मदत केली. तर, अभिनेता वरुण धवनने ३९०० ऑक्सिजन कंसंट्रेटर देशासाठी आयात केले आहेत.