esakal | 'मेडल जिंकलो तरच भारतीय नाही तर नेपाळी, चायनीज'; मिलिंदच्या पत्नीचं ट्विट
sakal

बोलून बातमी शोधा

milind ankita

'मेडल जिंकलो तरच भारतीय नाही तर नेपाळी, चायनीज'; मिलिंदच्या पत्नीचं ट्विट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता, मॉडेल आणि फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोनवार हिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ईशान्य भारतातील लोकांना कशा पद्धतीने हिणवलं जातं, याबाबत तिने ही पोस्ट लिहिली आहे. 'देशासाठी पदक जिंकलो तरच आम्ही भारतीय, नाहीतर आम्हाला नेपाळी, चायनीज किंवा चिंकी म्हटलं जातं', असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. स्वत:च्या अनुभवातून बोलत असल्याचंही तिने या पोस्टच्या शेवटी लिहिलं. अंकिताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत स्वत:चाही अनुभव सांगितला आहे. (milind soman wife ankita konwar post on racism faced by northeast india people slv92)

अंकिता कोनवारची पोस्ट-

'तुम्ही जर ईशान्य भारताचे असाल तर जेव्हा तुम्ही देशासाठी एखादं पदक जिंकाल तेव्हाच तुम्हाला भारतीय म्हणून संबोधलं जाऊ शकतं. अन्यथा आम्ही चिंकी, चायनीज, नेपाळी किंवा कोरोनाचा नवीन प्रकार म्हणून ओळखले जातो. भारत केवळ जातीवादानेच नाही वर्णभेदानेही बाधित आहे. माझ्या अनुभवातून बोलतेय', अशी पोस्ट अंकिताने लिहिली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने 'ढोंगी लोक' असा हॅशटॅगसुद्धा वापरला आहे. अंकिता ही आसामची असून तिलासुद्धा अशा टिप्पणींचा सामना करावा लागल्याचं तिने यातून सांगितलं.

हेही वाचा: मिलिंद सोमणचा सहजसोपा डाएट प्लॅन तुम्हीही करू शकता फॉलो

ऑलिम्पिकमध्ये मणिपूरच्या मिराबाई चानूला रौप्यपदक

मिराबाई चानू सैखोम हिने शनिवारी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. ४९ किलो वजनी गटात तिने रौप्यपदक जिंकत देशाची मान उंचावली. मिराबाई मणिपूरची असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

'इंडियन आयडॉल' फेम चँग मियांगनेही सांगितला होता धक्कादायक अनुभव

मुंबईत बाईकवरून जाणाऱ्या दोघांनी 'कोरोना' म्हणून हाक मारल्याचा धक्कादायक अनुभव 'इंडियन आयडॉल' फेम गायक आणि अभिनेता चँग मियांगने सांगितला होता. "माझा जन्म भारतात झाला. मी भारतीय आहे. ज्या लोकांना मला चायनीज म्हणून चिडवायचंय, त्यांनी मला खुशाल चिडवावं, पण त्यापुढे भारतीय हा शब्द जोडावा", असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

loading image
go to top