esakal | मिलिंद सोमण-अंकिताचा क्वारंटाईन टाईम बघून व्हाल घायाळ

बोलून बातमी शोधा

Milind Somand and wife Ankita enjoying their quarantine time

कोरोनामुळे का होईना त्यांना 'Me Time' मिळाला आहे. या सर्वांच्या फॅन्सनाही हे घरी बसून नक्की काय करतात हे जाणून घेण्यात फार रस असतो... अशाच प्रकारे एका अभिनेत्याचा आणि त्यांच्या पत्नीचा क्वारंटाईन फोटो सध्या व्हायरल होत आहे.

मिलिंद सोमण-अंकिताचा क्वारंटाईन टाईम बघून व्हाल घायाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी सगळेचजण आपापल्या परीने काळजी घेत असतानाच अनेक सेलिब्रेटी आपणाहून होम क्वारंटाईन झाले आहेत. दीपिका-रणवीर, अनुष्का शर्मा, रितेश देशमुख-जेनेलिया, विकी कौशल-सनी कौशल, आलिया भट, आयुषमान खुराना यांच्यासारखे अनेक सितारे कोरोनामुळे घरात बसून आहेत... पण हे फक्त घरात बसलेले नाहीत बरं का, तर ते त्यांचे छंद, आवडी-निवडी जोपासण्यात प्रचंड बिझी आहेत. कोरोनामुळे का होईना त्यांना 'Me Time' मिळाला आहे. या सर्वांच्या फॅन्सनाही हे घरी बसून नक्की काय करतात हे जाणून घेण्यात फार रस असतो... अशाच प्रकारे एका अभिनेत्याचा आणि त्यांच्या पत्नीचा क्वारंटाईन फोटो सध्या व्हायरल होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभिनेता आणि धावपटू मिलिंद सोमण हा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. कधी कमी वयाच्या मुलीशी लग्न तर कधी त्यांच्या हॉट फोटोशूटविषयी चर्चा होत असते. आताही मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता कोरोनामुळे घरात क्वालिटी टाईम घालवत आहे. दोघंही घरात आपापले छंद जोपासत आहेत. नुकताच मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक क्यूट फोटो शेअर केलाय. या फोटोत अंकिता मिलिंदला तेलाने हेड मसाज देत आहे. या फोटोला मिलिंदने 'सिंपल, हळूवार खोबरेल तेलाने मसाज' असं कॅप्शन दिलंय... हा फोटो मिलिंदच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय...

तर अंकिताही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सध्या अनेक गोष्टी शेअर करत आहे. नुकताच तिने एक गिटार वाजवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. मिलिंद नेहमी त्याच्या फिटनेस आणि पत्नीमुळे चर्चेत असतो. त्याची पत्नी अंकिता देखील फिटनेस फ्रिक आहे. मिलिंद आणि अंकिता या दोघांमधील वयाच्या फरकामुळे त्यांच्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असतात.