esakal | दोन मुलं झाल्यानंतरही इतकी फिट कशी? शाहिदच्या पत्नीने सांगितलं सिक्रेट
sakal

बोलून बातमी शोधा

mira rajput

गरोदरपणात महिलांचं वजन वाढणं साहजिक आहे. हे वजन जितक्या वेगाने वाढतं, तितक्या वेगाने कमी मात्र होत नाही.

दोन मुलं झाल्यानंतरही इतकी फिट कशी? शाहिदच्या पत्नीने सांगितलं सिक्रेट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गरोदरपणात महिलांचं वजन वाढणं साहजिक आहे. हे वजन जितक्या वेगाने वाढतं, तितक्या वेगाने कमी मात्र होत नाही. यासाठी मग केवळ योग्य आहार घेऊनच चालत नाही, तर त्याच्या जोडीला व्यायामसुद्धा सातत्याने करावा लागतो. एकीकडे अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीनंतरच्या फिटनेसची चर्चा असताना आता अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिनेसुद्धा तिचं फिटनेस सिक्रेट सांगितलं आहे. 

शाहिद आणि मीराला झैन आणि मिशा अशी दोन मुलं आहेत. मीराने नुकतंच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. प्रेग्नंसीनंतरच्या फिटनेसबद्दल प्रश्न विचारला असता मीरा म्हणाली, "मला हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे. पण फिट राहणं हे काही एका दिवसाचं काम नाही. त्यासाठी खूप वेळ लागतो आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं असतं. यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार. आहारासोबतच दररोज नियमित व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे."

हेही वाचा : 'सोशल मीडियावर जाहीर चर्चा नको'; मंदार देवस्थळी प्रकरणावरून अमेय खोपकरांचं आवाहन 

कधी वाद झाल्यास शाहिद जिंकतो की तू, असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला. त्यावर मीराने उत्तर दिलं, 'अर्थात मी. अजून कोण जिंकणार?' यावेळी शाहिदच्या एखाद्या वाईट सवयीबद्दल विचारलं असता ती म्हणाली, 'मेसेजमध्ये शाहिदच्या खूप चुका असतात. कधी कधी मला समजतच नाही की त्याला काय म्हणायचंय. पण आता मला त्याची सवय झाली आहे. टायपिंगमध्ये चुका असल्या तरी त्याला काय म्हणायचंय हे मला समजतं.'