Miss Universe 2023: मिस युनिव्हर्स स्पर्धा केव्हा आणि कुठे पाहायची अन् वोट कसं द्यायचं इथे आहे सविस्तर...

Miss Universe 2023
Miss Universe 2023Esakal

मिस युनिव्हर्स 2023 दरवर्षीप्रमाणे यंदाही मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा सुरू झाली आहे. यावेळी 71 वी मिस युनिव्हर्स सुरु होणार आहे. न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथील अर्नेस्ट एन मेमोरियल कन्वेंशन सेंटर येथे 14 जानेवारी रोजी या स्पर्धचा अंतिम टप्पा पार पडेल.

या स्पर्धेत जगभरातील 86 महिला सहभागी होणार आहेत. भारताकडून दिविता राय देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मिस युनिव्हर्स हरनाज संधू ही विजेत्या स्पर्धकाला मुकुट घालणार आहे.

भारताच्या हरनाझने डिसेंबर २०२१ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. या वर्षी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी मिस युनिव्हर्स ओलिविया कल्पो (Olivia Culpo) आणि जेनी मे जेंकिंस (Jeannie Mal Jenkins) करणार आहेत.

14 जानेवारी म्हणजे शनिवार रात्री 8 वाजता होणार आहे. भारतीय वेळेनुसार 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता होईल. हा कार्यक्रम न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथील अर्नेस्ट एन मेमोरियल कन्वेंशनमधून प्रसारित केला जाईल. भारतात, हा कार्यक्रम अधिकृत फेसबुक पेज आणि JKN 18 चॅनलच्या YouTube चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय ते Voot वर ऑनलाइन स्ट्रीम केले जाणार आहे.

तुम्हाला दर हा शो लाइव्ह पाहायचा असेल तर तुम्ही घरी बसूनही या शोमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडत्या स्पर्धकालाही मत देऊ शकता. मिस युनिव्हर्स अॅप डाउनलोड करुनही तुम्ही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला मत देवू शकतात. तुम्ही vote.missuniverse.com या वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही #MissUniverse ट्विट करून आणि नंतर #country चे नाव लिहून देखील मतदान करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com