esakal | नॅशनल क्रश रश्मिका मंदाना 'या' अभिनेत्यासोबत करतेय बॉलीवूडमध्ये धमाकेदार एंट्री, फर्स्ट लूक रिलीज
sakal

बोलून बातमी शोधा

rashmika mandana

रश्मिकाच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. रश्मिकाच्या या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना 'या' अभिनेत्यासोबत करतेय बॉलीवूडमध्ये धमाकेदार एंट्री, फर्स्ट लूक रिलीज

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- साऊथ सिने इंडस्ट्रीतील मोठं नाव आणि गुगलद्वारे २०२० या वर्षातील नॅशनल क्रश घोषित झालेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिकाच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. रश्मिकाच्या या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 

हे ही वाचा: अभिनेत्री सनी लिओनी 'या' वेबसिरीजमधून अनोख्या अवतारात येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत आगामी 'मिशन मजनू' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एंट्री घेतेय. या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. अनेक पुरस्कार प्राप्त ऍडफिल्म मेकर शांतनु बाग्ची या सिनेमाचं दिग्दरशन करणार असून ते देखील या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा सिनेदिग्दर्शक म्हणून नशीब आजमावणार आहेत.

'मिशन मजनू' हा सिनेमा १९७० च्या दशकातील सत्य घटनांवर आधारित आहे जी भारताने पाकिस्तानवर केलेल्या सगळ्यात बहादुर मिशनची कथा आहे. या मिशननंतर भारत पाकिस्तानचं नातं कायमचं बदललं होतं. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा रॉ एजंटच्या भूमिकेत दिसेल. तर कन्नड सिने इंडस्ट्रीचं सगळ्यात मोठं नाव रश्मिका मंदाना या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

रश्मिकाने या बॉलीवूड पदार्पणाबद्दल सांगताना अधिकृत जबाबात म्हटलं आहे की, 'मला प्रत्येक भाषेतील लोकांकडून एवढं प्रेम मिळालं आहे की मी त्यांची खूप आभारी आहे. एक अभिनेत्री म्हणून मला सिनेमाची कथा भावल्यानंतरच मी त्यावर काम करते आणि सिनेमाची भाषा माझ्यासाठी कधीच अडचण नाहीये. मी आनंदी आहे की हा सिनेमा एवढ्या सुंदरप्रकारे लिहिला गेला आहे आणि मी त्याचा एक भाग आहे.'  

कन्नड सिनेमातील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाला नुकतंच गुगलने नॅशनल क्रश घोषित केलं होतं. गुगलवर नॅशनल क्रश लिहिल्यावर सगळ्यात पहिलं नाव रश्मिका मंदानाचं येतं. रश्मिकाचे लाखो चाहते आहेत जे तिच्या सौंदर्यावर, तिच्या हरकतींवर फिदा आहेत. त्यामुळे या सिनेमाची आता चाहत्यांना मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे.   

mission majnu first look rashmika mandanna make her bollywood debut with sidharth malhotra