esakal | अभिनेत्री सनी लिओनी 'या' वेबसिरीजमधून अनोख्या अवतारात येणार प्रेक्षकांच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

sunny leone

बॉलीवूड पूर्ववत होत असताना सनीच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती तिच्या आगामी प्रोजेक्टची. नुकतीच सनीने सोशल मिडियावरुन तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. 

अभिनेत्री सनी लिओनी 'या' वेबसिरीजमधून अनोख्या अवतारात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- २०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच अनेक कठीण प्रसंगांनी भरलेलं होतं. हळूहळू अनेक गोष्टी रुळावर येत असताना सिनेसृष्टीने देखील त्यांची पावलं पुढे टाकली. संपूर्ण सिनेसृष्टी पुन्हा एकदा कामाला लागली असून आता नवनवीन प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर येऊ लागले आहेत. अभिनेत्री सनी लिओनी लॉकडाऊन दरम्यान सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह होती. त्यानंतर बॉलीवूड पूर्ववत होत असताना आता तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती तिच्या आगामी प्रोजेक्टची. नुकतीच सनीने सोशल मिडियावरुन तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. 

हे ही वाचा: सुजैन खानने अटकेच्या बातमीवर दिलं स्पष्टीकरण, पोस्ट शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती

सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत म्हटलंय, 'सतनाम, एका नव्या गोष्टीच्या सुरुवातीसोबत माझ्या लॉकडाऊनचा अंत झालाय. विक्रम भट्ट यांच्यासोबत एका नवीन यात्रेची सुरुवात.'  एका वेबपोर्टलने दिलेल्या रिपोर्टनुसार, सनी लिओनी 'अनामिका' ही वेबसिरीज करत असून ती मुख्य भूमिकेत झळकेल. 'अनामिका' बंदुक आणि ऍक्शनशी संबंधित वेबसिरीज आहे. या वेबसिरीजचे १० एपिसोड्स असतील.

सनी लिओनी यामध्ये अनोख्या अवतारात दिसून येईल जो तिच्या चाहत्यांनी कधी पाहिला नसेल. या सिरीजचं शूटींग मुंबईत होईल ज्याचं पहिलं शेड्युल या वर्षाच्या शेवटपर्यंत संपेल. 'अनामिका'बाबत माहिती देताना विक्रम भट्ट म्हणाले, 'लॉकडाऊनमुळे शूटींग थांबवण्यात आलं होतं. मात्र सिनेइंडस्ट्री कधी थांबत नाही, तेव्हा आम्ही पुन्हा तेच करायला सुरुवात केली आहे जे करायला आम्हाला खूप आवडतं.'

विक्रम भट्ट म्हणाले की आम्ही सनीसोबत काही दिवसांपूर्वीच शूटींग करायला सुरुवात केली आहे. ते म्हणाले सनीला बंदुकांसोबत ऍक्शन करताना पाहायला लोकांना खूप मजा येईल. ही वेबसिरीज एम एक्स प्लेअरवर रिलीज होईल.   

sunny leone to play the lead role in vikram bhatt new web series anamika  

loading image