भारत मंगळावर कसा पोचला? Mission Mangal चा ट्रेलर लॉन्च

सकाळ वत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, अभिनेता शरमन जोशी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भारताचा 'मंगल' प्रवास दाखवण्यात आला आहे.

एक दमदार स्टार कास्ट आणि वेगळा विषय, या दोन्ही गोष्टींचा मिलाव आपल्याला जगन शक्ती यांच्या आगामी 'मिशन मंगल' या चित्रपटात अनुभवायला मिलणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता आणि आज ‘मिशन मंगल’ चा ट्रेलर लॉन्च झाला. 

विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, अभिनेता शरमन जोशी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भारताचा 'मंगल' प्रवास दाखवण्यात आला आहे. या मिशन मंगलसाठी आपले दिवस रात्र एक केलेल्या लोकांची ही मंगलमय कहाणी आपल्याला पहायला मिळणार आहे. अमेरिके नंतर आपणही हा विक्रम करावा असे अनेक स्वप्न पुर्ण हाताना आपण या चित्रपटात पाहू शकणार आहोत.

या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चबद्दल अक्षय सहीत चित्रपटातील स्टारकास्टने चाहत्यांना सोशलमीडियावर माहिती दिली. आता या ट्रेलर लॉन्चने चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे यात काही शंका नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mission mangals trailer launched