ऑलम्पिक स्पर्धा मानाच्या मग सौंदर्यस्पर्धा का दुय्यम? हरनाज संधू भडकली...Harnaaz Sandhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harnaaz Sandhu

ऑलम्पिक स्पर्धा मानाच्या मग सौंदर्यस्पर्धा का दुय्यम?हरनाज संधू भडकली

तब्बल 21 वर्षांनी भारतानं 'मिस.युनिव्हर्स' स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि हरनाज संधू(Harnaaz Sandhu) हे नाव भाराताच्याच नाही तर जगाच्या कानाकोप-यात काही सेकंदातच पोहोचलं. 2000 साली लारा दत्तनं हे विजेतेपद पटकावलं होतं पण त्यानंतर मात्र कोणीच ही कमाल दाखवी शकलं नव्हतं. आता भारतात सौंदर्यवतींची कमतरता आहे तर तसंंही नाही, उलट सौंदर्यासोबतच तल्लख बुद्धिमत्ता असं बेस्ट कॉम्बिनेशन असलेल्या अनेक स्त्रिया भारतात आहेत पण तरीही 'मिस.युनिव्हर्स' स्पर्धा जिंकायला भारताला एवढे वर्ष वाट पहावी लागली. आता एवढं मोठं यश मिळवूनही हरनाज संधूला मात्र असं काही ऐकावं लागलंय की तिचा रागाचा पारा अचानक चढला आहे. असं काय कुणी बोललंय तिला हे जाणून घेऊया.

हेही वाचा: जय दुधाणेच्या घरी कशी पोहोचली बिग बॉस विनरची ट्रॉफी? काय घडलं नेमकं..

तर त्याचं झालं असं की एका मुलाखतीत ती म्हणाली,''मला दुःख होतंय की आजही लोकांना सौंदर्यस्पर्धा म्हणजे फक्त सुंदर दिसलं की झालं असंच वाटतं. तर असं नाही आहे. सुंदर दिसण्यासोबतच बुद्धिचातुर्यही तितकंच महत्त्वाचं आहे. अफाट वाचन करुन माहिती जेवढी संपादित करून घेऊ तेवढी कमी. आणि केवळ पुस्तकी किड्याला तर इथे थाराच नाही. तुम्ही चाणाक्ष असायला हवं. आणि इतकं सगळं असताना आजही लोक सौंदर्यस्पर्धांना दुय्यम स्थान देतात. मला ही ऐकावं लागलं की सुंदर दिसते,सुंदर चेहरा आहे म्हणून जिंकली. पण असं म्हणणा-यांना मला पुन्हा सांगावसं वाटतं की सौंदर्यस्पर्धा जिंकणं म्हणजे ऑलिम्पिक पदक जिंकण्यासारखंच आहे. तुम्ही एखाद्या खेळाडूला जितका मान देता तेवढा आम्हाला का नाही देत असा प्रश्न तिनं केला आहे.

हेही वाचा: बिग बॉसच्या घरातील 'ही'व्यक्ती होती विशाल निकमची नावडती ...

हरनाज संधू पुढे म्हणाली,''मी माझ्या कामातनं हे दाखवून देणार की सौंदर्य हे फसवं नसतं. मला मी करणा-या सिनेमांमध्ये अशा भूमिका करायच्या आहेत ज्या नुसत्या मेकअप करून मिरवणा-या नसतील. तर प्रत्येक भूमिकेत एक आव्हान असेल. हरनाज संधू 'मिस.युनिव्हर्स' व्हायच्या आधीपासनं पंजाबी सिनेमांतून काम करीत आहे. तिने कपिल शर्मा शो ची स्टार उपासना सिंगची निर्मिती असलेले दोन प्रोजेक्ट्सही साइन केले आहेत.

Web Title: Missuniverse Targets Olympic Competiotionswhy Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top