वरुण की विकी? कोण होणार 'मिस्टर लेले'?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

गेल्या वर्षी मिस्टर लेले या हिंदी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. दिग्दर्शक शशांक खेतान यांनी केलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर तेव्हा वरुण धवन प्रमुक भूमिकेत दिसत होता. वरुण आणि शशांक यांनी उत्साहात या चित्रपटाची सुरुवातही केली होती. दरम्यान, दोघांमध्ये बिनसल्यानं वरुणने चित्रपटात दिसणार नाही.

मुंबई - गेल्या वर्षी मिस्टर लेले या हिंदी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. दिग्दर्शक शशांक खेतान यांनी केलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर तेव्हा वरुण धवन प्रमुक भूमिकेत दिसत होता. वरुण आणि शशांक यांनी उत्साहात या चित्रपटाची सुरुवातही केली होती. दरम्यान, दोघांमध्ये बिनसल्यानं वरुणने चित्रपटात दिसणार नाही.

वरुण आणि शशांक यांच्यात स्क्रीप्टवरून मतभेद झाले. या मतभेदांमुळे चित्रपटाचे काय असा प्रश्न होता. चित्रपट बंद पडेल अशीही चर्चा रंगली होती. मात्र दिग्दर्शक खेतान यांनी स्क्रीप्टवर आणखी काम केले आहे. त्यानंतर आता वरुण जी भूमिका साकारणार होता त्यासाठी अभिनेता विकी कौशलला विचारले होते. विकी कौशलने या चित्रपटासाठी होकार दिला असल्याचे समजते.

Tandav Web series; अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अनंत काळासाठी नाही, सुप्रीम कोर्टानं फटकारलं

मिस्टर लेले हा एका स्पाय कॉमेडीवर आधारीत चित्रपट आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या विकी कौशलला अशा कॉमेडी चित्रपटात पाहणं त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. 

राखीला गार्डनमध्येच घातली अंघोळ; अलीनं लावला कंडिशनर 

विकी कौशल याआधी राझी, संजू, भूत यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मिस्टर लेलेमध्ये त्याची भूमिका नक्की झाल्यास धर्मा प्रोडक्शनसोबत त्याचा हा तिसरा चित्रपट असणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mister lele varun dhawan out vicky kaushal will play role