esakal | हिमाचल प्रदेशात मितालीची भटकंती; मित्रांसोबत घेतेय ट्रिपचा मनमुराद आनंद
sakal

बोलून बातमी शोधा

हिमाचल प्रदेशात मितालीची भटकंती; मित्रांसोबत घेतेय ट्रिपचा मनमुराद आनंद

हिमाचल प्रदेशात मितालीची भटकंती; मित्रांसोबत घेतेय ट्रिपचा मनमुराद आनंद

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री मिताली मयेकर, 'इंडियन आयडॉल १२' फेम नचिकेत लेले आणि गायिका जुईली जोगळेकर हे तिघं मिळून सध्या हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. या तिघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिताली आणि जुईली यांची मैत्री आधीपासूनच होती, त्यात आता नचिकेतची भर पडली आहे. (Mitali Mayekar Nachiket Lele and Juilee Joglekar enjoying Himachal Pradesh trip slv92)

'एकत्र प्रवास करणारे, एकत्र राहणारे मित्र', असं कॅप्शन देत जुईने काही फोटो पोस्ट केले आहेत. तर हिमाचलमधील नदीजवळ मजामस्ती करतानाचा एक व्हिडीओ नचिकेतने पोस्ट केला आहे. 'जेव्हा निसर्ग आणि मित्र एकत्र भेटतात, तेव्हा तुम्ही एकत्र मिळून गाणं गायलाच हवं', असं कॅप्शन त्याने व्हिडिओला दिलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हे तिघं फिरण्याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचं या फोटो आणि व्हिडिओमधून दिसून येतंय. या तिघांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनीही भरभरून कमेंट्स केले आहेत.

हेही वाचा: 'माझा होशील ना'मध्ये नवीन ट्विस्ट; आदित्य देसाई विरुद्ध आदित्य देसाईचा सामना

जानेवारी महिन्यात मितालीने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर एकमेकांसोबत निवांत क्षण घालवण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्रातील 'द मचान' हे रिसॉर्ट निवडलं होतं. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लोणावळ्यातील 'द मचान' या रिसॉर्टमधील सिद्धार्थ-मितालीच्या फोटोंना नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. जुईली जोगळेकर ही गायक रोहित राऊतला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. रोहित-जुईली आणि सिद्धार्थ-मिताली यांच्यातही खूप चांगली मैत्री आहे.

loading image