Mitali Mayekar News: 'माझ्या सासूचं लग्न!' सिद्धार्थच्या आईचं दुसरं लग्न; मितालीला सासूच्या निर्णयाचा अभिमान

Mitali Mayekar  Post On  Siddharth Chandekar  mother second marriage of his mother Seema Chandekar 
Mithali Mayekar's special post about mother-in-law Seema Chandekar' s second marriage
Mitali Mayekar Post On Siddharth Chandekar mother second marriage of his mother Seema Chandekar Mithali Mayekar's special post about mother-in-law Seema Chandekar' s second marriageEsakal

Mitali Mayekar Post On Siddharth Chandekar Mother Second Marriage: मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेली आणि तितकीच लोकप्रिय जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. दोघांची लव्ह स्टोरी चाहत्यांना प्रेमात टाकते. मात्र सध्या सिद्धार्थ त्याच्या आईमुळे चर्चेत आला आहे. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्या आहेत.

सिद्धार्थ आणि त्याची पत्नी मिताली मयेकर यांनी स्वतः पुढाकार घेत आईच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि मिताली दोघांचे कौतुक होत आहे. सिद्धार्थने याबाबत पोस्ट करत चाहत्यांना गूडन्यूज दिली होती. आता त्यातच सिद्धार्थची पत्नी मिताली मयेकर हिने देखील तिच्या लाडक्या सासूबाईसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे.

Mitali Mayekar  Post On  Siddharth Chandekar  mother second marriage of his mother Seema Chandekar 
Mithali Mayekar's special post about mother-in-law Seema Chandekar' s second marriage
Siddharth Chandekar: "आता मी तुझं लग्न लावतोय", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, अभिनेत्याचा आईला पाठिंबा

सासूबाईच्या लग्नातील काही खास क्षणाचे फोटो मितालीने शेयर केले आहे. या पोस्टमध्ये मिताली लिहिते की,

'Happy married life सासूबाई!

माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते?

खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा.

आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच.

तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.'

Mitali Mayekar  Post On  Siddharth Chandekar  mother second marriage of his mother Seema Chandekar 
Mithali Mayekar's special post about mother-in-law Seema Chandekar' s second marriage
Rakesh Bedi: हिमाचल प्रदेशात झालेल्या भूस्खलनात अडकला प्रसिद्ध अभिनेता! हाताचं बोट तुटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

तर सिद्धार्थने आईच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत लिहीलं होतं की, "Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस.

आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life" अशी पोस्ट करत सिद्धार्थने आईला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात

Mitali Mayekar  Post On  Siddharth Chandekar  mother second marriage of his mother Seema Chandekar 
Mithali Mayekar's special post about mother-in-law Seema Chandekar' s second marriage
Rakhi Sawant Reaction: 'गर्भपात..मारहाण..फसवणुक..फायदा अन् भिकारी आदिल'! राखी सावंतचा पलटवार

दरम्यान मिताली आणि सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत दोघांच कौतुक केले आणि सीमा चांदेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com