
कोविड पॉझिटिव्ह आल्या तरी म्हणतात की, करा एन्जॉय !
सुरुवातीला कोविड-19 ची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर, अभिनेत्री कुब्ब्रा सैत (Kubbra Saith) आता पॉझिटिव्ह आली आहे. तिच्या इंस्टाग्राम (Instagram)हँडलवर, अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल अपडेट देणारी एक नोट शेअर केली.
ती लिहीते, 'मित्रानो, पहिले म्हणजे #maskup आणि दुसरी गोष्ट, मला कोविड -19 ची लागण झाली आहे. जर तुम्ही माझ्या संपर्कात अला असाल, तर कृपया होम टेस्ट करा. घरातच राहून विश्रांती घेणे हा चांगला पर्याय आहे. सध्या मी ठीक आहे. विश्रांती आणि टीव्ही हेच चालू आहे. आपली मनःस्थिती शांत ठेवा, भरपूर द्रवपदार्थांचे सेवन करा, थोडा टीव्ही आणि फोन पहा.अश्याने ५-७ दिवसांत आपण #ByeOmicron'असे म्हणू शकतो.

Kubbra Saith
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत, कुब्राने मायक्रो-ब्लॉगिंग (Micro Blogging) साइट सोडण्याबद्दल उघड केले. ती म्हणाली, "मी काही काळासाठी ट्विटर सोडले आणि 'फाऊंडेशन' (Foundation)चा प्रचार करण्यासाठी परत आले आहे.
मी केलेल्या निवडी माजझ्यासाठी ठीक आहेत. मला स्वतःच्या खर्चावर सर्वत्र असण्याची गरज नाही. मला वाटत नाही जगातील कोणीही माझ्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. मी हे अहंकाराने म्हणत नाही; मला हे माझ्या मानसिक आरोग्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, मला असलेल्या काळजीसाठी म्हणायचे आहे. त्यामुळे, मी फक्त त्याबद्दल बोलण्याऐवजी माझ्या मनाला कृतीकडे प्रवृत्त करू शकले तर मला वाटते की मी अधिक चांगल्या ठिकाणी असेन"
त्याचबरोबर, अभिनेत्री मिथिला पालकर सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय असते. 'मुरांबा' (Muramba)अभिनेत्रीने नुकतेच तिच्या चाहत्यांना कळवले की ती देखील कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ती म्हणते की ती सध्या घरच्यांचे आणि मित्रांचे लक्ष वेधून घेत आहे, आणि ते ती एन्जॉय करत आहे.
दरम्यान, वर्क फ्रंटवर, मिथिला तिच्या 'लिटिल थिंग्ज' (Little Things) या वेब सीरिजसाठी चर्चेत आहे. या बहुचर्चित सीरिजचा लास्ट सिझन नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Digital Platform) प्रदर्शित झाला.

Mithila Palkar
Web Title: Mithila Palkar Kubbra Saith Gets Covid Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..