मिथून चक्रवर्ती यांच्या सूनेचा डान्स व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 9 November 2020

मदालसा सतत डान्स व्हिडीओ आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

मुंबई- बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. मदालसा सतत डान्स व्हिडीओ आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हे ही वाचा: वाढदिवशीच मुलाचं निधन, कॉमेडियन राजीव निगमची भावूक पोस्ट    

मिथुन दा यांची सून मदालसा शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ये गलियाँ ये चौबारा’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील तिचा डान्स पाहण्यासारखा आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा डान्स व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 

मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माचा हा डान्स व्हिडीओ प्रसिद्ध टीव्ही शो 'अनुपमा'च्या सेटवरील आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत ७८ हजार लोकांनी पाहिला आहे. मदालसाने मिमोह चक्रवर्तीशी लग्न केलं होतं. ती प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. तिने तेलुगू इंडस्ट्रीमध्ये देखील काम केलं आहे. ती सध्या 'अनुपमा' या मालिकेत काम करतेय.

मदालसा ही प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते, दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. मदालसाने २०१८ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीशी लग्न केलं. तिने २००९ मध्ये तेलुगू सिनेमा ‘फिटिंग’मध्ये काम करत अभिनयाच्या कारकिर्दिला सुरुवात केली.

mithun chakraborty daughter in law madalsa sharma dance video viral 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mithun chakraborty daughter in law madalsa sharma dance video viral