
राजीव निगम यांचा मुलगा देवराज याचं ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले आहे. पण देवराजच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मुंबई- आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं निधन झाले आहे. राजीव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. राजीव निगम यांचा मुलगा देवराज याचं ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले आहे. पण देवराजच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
हे ही वाचा: 'बिग बॉस १४' मधील ‘या’ स्पर्धकाला करावा लागला होता आर्थिक संकटाचा सामना
कॉमेडियन राजीव निगम यांचा रविवार ८ नोव्हेंबर रोजी वाढदिवस देखील होता. त्यांच्या वाढदिवशीच दुर्देवाने त्यांच्या मुलाचं निधन झालं आहे. राजीव यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अतिशय भावूक होत लिहिलंय, ‘वाढदिवशी अशी भेट कोणी देतं का? माझा मुलगा देवराज आज मला सोडून गेला. माझ्या वाढदिवसाचा केक न कापताच गेला’ असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
राजीव यांनी ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत काम केलंय. तसंच 'कॉमेडी सर्कस के अजूबे', 'कॉमेडी सर्कस का जादू', 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार', 'ये तो होना ही था' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
rajeev nigam son passed away know unknown facts about comedian