'फिल्मसिटी मुंबईबाहेर न्यायची हे तर मोठं कारस्थान', अमेय खोपकरांचा आरोप

ameya khopkar mns
ameya khopkar mns

मुंबई- बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना याआधी गंभीर गुन्ह्यांमुळे जेलची हवा खावी लागली होती. कित्येकांना शिक्षा झाली मात्र यामुळे बॉलीवूडला दोषी मानलं नाही मात्र सध्या जे काही सुरु आहे त्यात हेतुपुर्वक बॉलीवूडला बदनाम केलं जात आहे. बॉलिवूड स्थलांतरीत करण्याचा नावाखाली कारस्थान रचलं जातंय अशा शब्दात मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं हे कुटील कारस्थान रचलं जातंय, असा आरोप यावेळी अमेय खोपकर यांनी केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेय खोपकर यांनी त्यांचं मत मांडलं आहे. ’भूतकाळातही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे., असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.'

मुंबईतून बॉलिवूडला संपवण्याचे किंवा स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचं विधान मुख्यमंत्री उद्ध-व ठाकरे यांनी केलं होतं. कोरोना पार्श्वभुमी आणि सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मल्टीप्लेक्स आणि सिनेमा थिएटर मालकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटींग घेतली. त्यावेळी ते या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.

मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानीच नव्हे तर सांस्कृतिक राजधानी देखील आहे. बॉलिवूड आणि सिनेमामुळे असंख्य रोजगार निर्माण होत असल्याचंही ते म्हणाले. काहीजण बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, हे खूपच चिंताजनक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

mns amey khopkar reaction on bollywood controversy and uttar pradesh filmcity  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com