गोदावरी, सनी सिनेमांचे खेळ कमी केल्यानं मनसे आक्रमक; अमेय खोपकरांचा 'हा' इशारा : MNS on Multiplex | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amey Khopkar

MNS on Multiplex: गोदावरी, सनी सिनेमांचे खेळ कमी केल्यानं मनसे आक्रमक; अमेय खोपकरांचा 'हा' इशारा

मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये गोदावरी आणि सनी या मराठी चित्रपटांचे खेळ कमी केल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मल्टिप्लेक्स चालकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपरकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. (MNS on Multiplex Time to teach multiplex operators a lesson Amey Khopkar warning)

हेही वाचा: Navale Bridge Accident: ब्रेक फेल नव्हे, ड्रायव्हरची मस्ती नडली; नवले ब्रिज अपघाताचं कारण आलं समोर

खोपकर यांनी ट्विट करुन म्हटलं की, गोदावरी आणि सनी या दोन्ही चित्रपटांचे शो सोमवारी कमी झाले हे संतापजनक आणि दुर्देवी आहे. लोकप्रिय आणि चांगल्या कलाकृतींना बळ देणं गरजेचं आहे. सनी चित्रपटाला किती गर्दी होतं आहे हे सोशल मीडियातील व्हिडिओंमधून स्पष्ट होतंय, असं असूनही मल्टिप्लेक्स चालक नालायकपणा करत आहेत. म्हणून त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

मराठी प्रेक्षकांनी थिएटरमध्येच जाऊन सिनेमा पाहावा

मनसेची पुढची भूमिका मांडताना मी मल्टिप्लेक्स संघटनेच्या प्रमुखांना मी फोन केला आहे. त्यांना सांगितलं की, तुमची नाटकं पुन्हा सुरु झाली आहेत. हिंदी सिनेमा चाललाय तर ठीक आहे पण महाराष्ट्रात मराठी सिनेमांना स्क्रीन मिळाल्याच पाहिजेत. गोदावरी आणि सनी हे सिनेमे चांगले चाललेत. आत्ताच शुक्रवारी सुरु झालेले हे सिनेमे आहेत. मराठी सिनेमे माऊथ पब्लिसिटीवर चालतात. माझी मराठी प्रेक्षकांना विनंती राहिलं की त्यांनी हिंदी प्रमाणं मराठी सिनेमा हा थिएटरमध्येच जाऊन पाहिला पाहिजे.

हेही वाचाः गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

सरकारनं कर सवलती काढून घ्याव्यात

माझी सरकरला विनंती आहे की, आपण या थिएटर मालकांना कर सवलती देतात ती ताबडतोब काढून घ्या. तुमच्या स्क्रीनच्या तुलनेत मराठीला देखील स्क्रीन द्या. पण आम्ही शो लावणारच नाही, हे चालणार नाही. आमच्या लोकांना थिएटरला पाठवून गोदावरी आणि सनीचे शोज नक्की लावून घेईन, असंही खोपकर यांनी यावेळी सांगितलं.