34 व्या वर्षी लिसाची तिस-या बाळंतपणाची तयारी; व्हिडिओ केला शेअर 

Model actress Lisa Haydon enlists her son to announce she pregnant with her third child baby girl
Model actress Lisa Haydon enlists her son to announce she pregnant with her third child baby girl
Updated on

मुंबई - अभिनेत्री लिसा हेडल तिस-यांदा आई होणार आहे. तिनं त्याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. आपण तिस-यांदा आई होणार असल्याची गुड न्यूज तिनं इंस्टावर एक व्हिडिओ शेयर करुन दिली आहे. लिझानं सांगितले की, जूनमध्ये डिलिव्हरी होणार आहे. यापूर्वी मी काही सांगितले नाही याचे कारण म्हणजे ते सांगण्यासाठी मी केलेला आळस हे आहे.

लिसानं जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यात एक लहान मुलगा येऊन सांगतो की माझ्या जोडीला एक बहिण येणार आहे. त्यावेळी लिसा तिचा मुलगा जॅकीला सांगते की, तु सगळ्यांना सांगु शकतो की आईच्या पोटात  काय आहे, तेव्हा जॅक आनंदित होऊन सांगतो माझी बहिण. लिसा आणि तिचा पती डिनो लालवानी हे लियोचे आई वडिल आहेत. दोन मुलांची आई असूनही लिझाचा फिटनेस उत्तम आहे. तिच्या त्या व्हिडिओला मोठया प्रमाणात प्रसिध्दी मिळत आहे. फॅन्सनं तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

वयाच्या 17 व्या वर्षी लिसानं मॉडेलिंगला सुरुवात केली होती. ती किंगफिशर गर्ल म्हणूनही प्रसिध्द आहे. तिनं फॅशन जगतातील वेगवेगळ्या मॅगझीनसाठी फोटोशुट केले आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. फेमिना, वर्व, एफएचएम आणि हार्पन बाजार सारख्या प्रमुख मॅगझीनसाठी फोटोशुट केले आहे. त्यामुळे लिझा प्रसिध्दीच्या झोतात राहिली आहे. 

लिसाला योगा करण्याची आवड आहे. मॉडेलिंगमध्ये येण्यापूर्वी तिला योगा टीचर व्हायचे होते. रनिंग हा तिच्या आवडीचा व्यायाम प्रकार आहे. उसेन बोल्ट हा तिच्या आवडीचा खेळाडू आहे. लिझाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे की, ती केवळ मॉडेल नसून ती एक भरतनाट्यम डान्सरही आहे. आयशा चित्रपटातून लिझानं चित्रपटात पदार्पण केलं होतं. त्याशिवाय हाऊसफुल्ल 3, द शौकिन्स, ,क्वीन, ऐ दिल है मुश्किल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com