अभिनेत्री पूनम पांडेला खरोखर अटक? वाचा स्वतःच्याच अटकेबाबत व्हिडिओ शेअर करुन पूनम काय म्हणाली..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

अभिनेत्री पूनम पांडेला लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याने अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर तिच्यावर काही कलमांअतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. मात्र नुकताच या प्रकरणावर पूनम पांडे हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे

मुंबई- कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनव जाहीर केलं आहे. अशातंच बातमी आली होती की मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याने अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर तिच्यावर काही कलमांअतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. मात्र नुकताच या प्रकरणावर पूनम पांडे हिने एक व्हिडिओ शेअर करत याबाबतची सत्य परिस्थिती सांगितली आहे. 

हे ही वाचा: अभिनेत्री तापसी पन्नू करतेय 'या' खेळाडूला डेट

सध्या लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांसोबतंच सेलिब्रिटीही घरात बसून आहेत. सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना हरत-हेने घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. मात्र याचदरम्यान नेहमीच बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असलेली मॉडेल पूनम पांडे लॉकडाऊनचे नियम भंग केल्याने चर्चेत आली होती. आणि म्हणूनंच आता पूनमने एक व्हिडिओ शेअर केला आहे. पूनमच्या या व्हिडिओमधून ती या बातम्या खोटं असल्याचं आणि अफवा असल्याचं सांगतेय.

पूनमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पूनम सांगतेय, नमस्कार मित्रांनो, मी काल रात्री मॅराथन हा सिनेमा बघत होती. मी एकामागोमाग एक असे तीन सिनेमे पाहिले. छान होते सिनेमे. मला काल रात्रीपासून फोन येत आहेत की मला अटक झाली आहे आणि मी काही बातम्यादेखील पाहिल्या. मित्रांनो माझ्याविषयी असं लिहू नका. मी घरातंच आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Guys I heard I got arrested, While I was having a movie marathon last night.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

मात्र रिपोर्ट्सनुसार रविवारी रात्री लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी पूनम पांडे आणि तिच्यासोबत असलेल्या मित्राला अटक केली होती. वरिष्ठ पोलिस निरिक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पूनम पांडे आणि सॅम अहमद यांच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती नियमाअंतर्गत आयपीसी कलम २६९ आणि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

model poonam pandey shared a video on instagram about her arresting  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: model poonam pandey shared a video on instagram about her arresting